Election Results 2019 : #GobackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये

जाणून घ्या काय म्हणत आहेत नेटकरी, कसा आहे त्यांचा सूर 

Updated: May 23, 2019, 08:43 AM IST
Election Results 2019 : #GobackModi ट्विटरवर ट्रेंडमध्ये  title=

मुंबई : lok sabha results 2019 लोकसभा निवडणुकांच्या निकालांचं चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. देशात सध्या असणाऱ्या भाजपाच्या सरककारला पुन्हा सत्तेत येण्याचा कौल एक्झिट पोलने दिला होता. ज्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. पण, देशातील जनतेचं मत मात्र याउलट असल्याचं स्पष्ट होत आहे. 

सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर काही ट्रेंड जोरदार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्या विषयी निगडीत असणारे बरेच ट्रेंड ट्विटरवर सुरु आहेत. याच ट्रेंडमध्ये #आ_रही_है_कांग्रेस आणि #GobackModi असे ट्रेंडही नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचा या दोन्ही हॅशटॅगअंतर्गत विरोध करण्यात येत आहे. 

#GobackModi या हॅशटॅगअंतर्गत विविध मीम्स, ट्विट आणि उपरोधिक वक्तव्यांच्या माध्यमातून भाजपावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या ट्रेंडध्ये दाक्षिणात्य राज्यांची देशाच्या राजकीय पटलावर अणारी महत्त्वाची भूमिकाही अधोरेखित करण्यात आली आहे. काळे झेंडे म्हणू नका आणि फलकांच्या आधारेही मोदींचा विरोध करण्यात येत आहे. तर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या काँग्रेसला समर्थकांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, अब मंजिल दूर नही असं म्हणत काँग्रेसचाच विजय होणार असं म्हणणाऱ्यांची संख्याही कमी नाही. ट्विटवर सुरु असणारं हे हॅशटॅगचं युद्ध पाहता आता निकालस्वरुपी विजयी मुद्रा कोणाच्या पारकड्यात पडते हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.