लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीसाठीचा भाजापाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे.

Updated: Apr 8, 2019, 08:06 AM IST
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीचा भाजापाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहित पार्टी अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. 'संकल्प पत्र' असे या जाहीरनाम्यास नाव देण्यात आले आहे. काँग्रेसने गरीबांना 72 हजार देण्याची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यात केली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संकल्प पत्रात देखील यापेक्षा मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली जाण्याची शक्यता आहे. 

भाजपाच्या आजच्या जाहीरनाम्यात केवळ पुढच्या पाच वर्षांबद्द्लचे आश्वासन दिले जाईल असे नाही. तर गेल्या वर्षांचा लेखाजोखा देखील मांडला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. काम करणारे सरकार, ईमानदार सरकार आणि मोठ्या घोषणा करणारे सरकार या मुद्दयांवर भाजपाचा 2019 जाहीरनामा असेल.

1) विकास धोरण 
2) राष्ट्रवाद- सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक, गगनयान आणि मिशन शक्तीचा उल्लेख 
3) रोजगार- मुद्रा बॅंक, डिजिटल इंडिया, मेक इन इंडीयाच्या माध्यमातून रोजगार 
4) सुरक्षा - भारताची पाकिस्तान आणि चीन बद्दलची मजबूत निती, काश्मीरची सुधारलेली स्थिती, नक्षलवादावर लगाम, त्यांना मिळणार्या सुविधांवर बंदी
5) शेतकऱ्यांची कमाई दुप्पट करण्याचे प्रयत्न 
6) युवा भारत- तरुणांसाठी केला गेलेला प्रयत्न 
7) राम मंदिर- भव्य राम मंदिर बनवणे हे लक्ष्य 
8) कलम 370 आणि 35 A चा उल्लेख 
9) गरीबांना सक्षम बनवण्यासाठीच्या योजना 
10) महिलांची सुरक्षा, स्वाभीमान आणि लैंगिक समानतेसाठी केलेले प्रयत्न 
11) मध्यम वर्ग- करातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ