भुवनेश्वर : ओडिशामध्ये गुरूवारी लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या टप्प्याचे मतदान हिंसामुक्त राहीले. पण मलकानिगिरी जिल्ह्यातील काही नक्षलवाद प्रभावी क्षेत्रामध्ये शून्य टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तर काही ठिकाणी गावकऱ्यांच्या स्थानिक मागणीसाठी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मलकानगिरी जिल्ह्याच्या चित्रकोंडा भागात साधारण 12 मतदान केंद्रात शून्य टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. काही स्थानिक मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) सुरेंद्र कुमार यांनी सांगितले. तर मलकानगिरी जिल्ह्याच्या काही भागात नक्षली प्रभावामुळे शून्य टक्के मतदानाची नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात निवडणुकीच्या मतदानाचा स्तर सामान्य होता. शेवटचा आकडा येईपर्यंत गेल्यावर्षी इतके मतदान होण्याची शक्यता निवडणूक उपायुक्त उमेश सिंन्हा यांनी सांगितले. 20 राज्यांच्या मतदान असलेल्या जागांवर शांतिपूर्ण मतदान झाले. काही ठिकाणी हिंसा आणि अडथळा आणण्याच्या तक्रारी आल्या पण त्या तात्काळ दूर करण्यात आल्या.
पहिल्या टप्प्यात 91 जागांवर एकूण 1239 उमेदवार निवडणुकीत रिंगणात होते. आंध्र प्रदेशच्या 25 जागांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 66 टक्के आणि तेलंगणाच्या 17 जागांवर 60 टक्के मतदान झाले. संयुक्त आंध्र प्रदेशमध्ये 2014 मध्ये 76.64 टक्के मतदान झाले. उत्तराखंड येथील पाच जागांवर 57.85 टक्के मतदान झाले. राज्यामध्ये 2014 62.15 टक्के मतदान झाले होते. अरुणाचल प्रदेशच्या दोन जागांवर 66 टक्के मतदान झाले. राज्यामध्ये 2014 मध्ये मतदान 80 टक्के राहिले. मेघालयच्या दोन जागांवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 67.1 टक्के मतदान झाले. गेल्यावेळीस ते 68 टक्के मतदान झाले होते.