LIVE UPDATE : आसनसोलयेथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरूवात झाली.

Updated: Apr 29, 2019, 09:45 AM IST
LIVE UPDATE : आसनसोलयेथे तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरूवात झाली. ९ राज्यांमध्ये एकूण ७१ जागांवर मतदाना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. चौथ्या महत्वाच्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ई्व्हिएममध्ये कैद होणार आहे. राज्यातील हा महत्वाचा टप्पा आहे. मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदाना दरम्यान हिंसा भडकली आहे. आसनसोलच्या जेमुआमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही बाजूने जोरदार हल्ला करण्यात येत आहे. त्यांना ताब्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात सुरूवात केली. 

 

मलाड पश्चिमेतील बूथ नंबर १६२ मधील ईव्हिएममध्ये तांत्रीक बिघाड झाला. मतदानाला सुरू होताच मतदान यंत्र बिघडण्याची समस्या कायम राहिली आहे. त्यानंतर सुद्धा मतदान यंत्र बदलण्यात आले नाही.

    

मुंबई उत्तर मध्यभागातून भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी वरळी येथून मतदान केले. पूनम महाजन भाजपाचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. भारतीय रिजर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे गायक शंकर माहादेवन यांनी वाशीमधील गोल्डक्रेस्ट स्कूल येथून त्यांच्या पत्नीसह मतदान केले आहे. 

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मतदार संघातील उमेदवार आणि अभिनेता रविकिशन यांनी मुंबईमधील गोरेगांव येथून आपले मत नोंदवले. तर अभिनेत्री रेखाने वांद्रे येथून मतदान केले आहे.  

 

मतदान सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मतदारांना जास्तीत-जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणुकीत ३३ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक लाख ६६ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.