विशाखापट्टणम : बसपा प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान बनण्याचे संकेत दिले आहेत. जर संधी मिळाली तर केंद्रात सर्वात चांगले सरकार बनवण्यात उत्तर प्रदेश मुख्यमंत्री म्हणून मिळालेला अनुभव पणाला लावेन असे त्या म्हणाल्या. मी चार वेळा उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री राहिल्याचेही त्यांनी सांगितले. एका संम्मेलना दरम्यान त्या बोलत होत्या. मला खूप अनुचित असून केंद्रात आणि लोकांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असेही त्या म्हणाल्या.
जर आम्हाला केंद्रात सरकार मिळाले तर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये वापरलेल्या सर्व निती वापरू आणि सर्व दृष्टीकोनातून चांगले सरकार देऊ असे मायावती यावेळी म्हणाल्या. तुम्हाला पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी 23 मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे त्या म्हणाल्या. बहुजन समाजवादी पार्टी ही आंध्रप्रदेशमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीत जनसेना, माकपा आणि भाकपा सोबत निवडणूक लढत आहे. बसपा राज्यातील 25 लोकसभा जागांमधून 3 तर विधानसभेच्या 175 जागांवरील 21 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जनसेना पार्टी प्रमुख पवन कल्याण देखील यावेळी उपस्थित होते.
आम्हाला राष्ट्रीय स्तरावर बदल हवा आहे. 2014 मध्ये निवडणुकीत त्यांचा पक्ष भाजपा आणि काँग्रेस नंतर तिसऱ्या स्थानावर होती. तिसऱ्या आघाडीची गरज आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. निवडणूक निकाल आल्यावर हे स्पष्ट होईल असे उत्तर यावेळी मायावतींनी दिले. राज्यात झालेली युतीच आंध्र प्रदेश सरकार बनवेल आणि पवन कल्याण त्याचे मुख्यमंत्री असतील असेही त्यांनी यावेळी म्हटले.