३ मे नंतर तुमच्या भागात लॉकडाऊन वाढणार की संपणार? पाहा

लॉकडाऊन वाढणार की संपणार?

शैलेश मुसळे | Updated: May 1, 2020, 06:10 PM IST
३ मे नंतर तुमच्या भागात लॉकडाऊन वाढणार की संपणार? पाहा title=

मुंबई : मागील ४० दिवसांपासून भारत बंद आहे. भारतातील लोक एक प्रकारे घरात कैद आहेत. लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. पण ४ मे पासून लॉकडाऊन संपेल का असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. ४ मे नंतर खरंच पुन्हा जनजीवन सामन्य होणं शक्य आहे का?

देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी भारताने आतापर्यंत दोन वेळा (४० दिवस) लॉकडाऊन जाहीर केले. ३ मे जवळ येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपणार की पुन्हा वाढणार याबाबत अजूनही अनेकांच्या मनात शंका आहेत.

देशात सध्या कोरोनाचे ३३ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. तर एका आठवड्यापूर्वीपर्यंत रुग्णांची संख्या २० हजारही नव्हती. म्हणजेच, गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. परंतु तज्ञांच्या मते, हा वेगही काहीच नाही, कारण रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग येत्या दोन आठवड्यांत दिसून येईल, आणि ही वेळ 3 मेपासून सुरु होईल. म्हणजेच, लॉक डाउनच्या शेवटच्या तारखेपासून. आता प्रश्न असा आहे की कोणत्या परिस्थितीत कोरोना रूग्णांची गती सर्वाधिक वाढणार आहे. सरकार लॉकडाऊन संपवण्याचा धोका स्वीकारेल का?

देशात एकूण रुग्णांची संख्या ३३ हजार

देशात एकूण मृत्यू १०७५

राज्य - रुग्णांची संख्या - मृत्यू

महाराष्ट्र - 9318 - 400 मृत्यू

गुजरात  3775 - 182

दिल्ली - 3315 - 54

मध्यप्रदेश - 2561 - 119

राजस्थान - 2365 - 51

उत्तरप्रदेश - 2115 - 36

तामिलनाडु - 2060 - 25

आंध्रप्रदेश - 1332 - 31

ही आठ राज्ये सोडली तर इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हजारांपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू यासारख्या अनेक राज्यात रुग्णांची संख्या वाढण्याचं थांबत नाहीये. आणि देशातील कोरोनाची सद्य परिस्थितीशी लढा देण्यासाठी लॉकडाउन हे सध्या असलेले एकमेव शस्त्र आहे. कोरोनावर लस मिळेपर्यंत सर्वांपुढे हाच एक पर्याय आहे.

अशा परिस्थितीत, तज्ज्ञ आणि अनेक राज्य सरकारांनी केंद्र सरकारला लॉकडाऊन न उघडण्याचा सल्ला दिला आहे. कारण ते आणखी धोकादायक ठरू शकते. अगदी जगभरातील तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात भारतात कोरोनाची प्रकरणे शिगेला पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत लॉकडाउन उघडल्यास परिस्थिती हाताळणे अशक्य होईल.

जगाशी तुलना केली तर भारतासारख्या १३० कोटी लोकं असलेल्या देशात कोरोनाची प्रकरणे अजूनही हजारोंमध्ये आहेत. त्यामागील एकमेव कारण लॉकडाउन आहे. तज्ञांचा असं मत आहे की, भारताने वेळेत लॉकडाउनचा निर्णय घेतला. अन्यथा परिस्थिती सांभाळणं अशक्य झालं असतं. डब्ल्यूएचओ तसेच संपूर्ण जग कोरोनाशी लढा देण्याच्या तत्परतेबद्दल भारताचे कौतुक करीत आहे. पण देश आणखी किती काळ लॉकडाऊनमध्ये राहिल, हा देखील प्रश्न आहे. अर्थव्यवस्था अडचणीत ठेवून भारत किती काळ ठप्प राहू शकेल? दररोज वेतन मिळवणार्‍यांना किती दिवस कामापासून दूर ठेवले जाऊ शकते. अर्थात, मधला मार्ग शोधणे देखील आवश्यक आहे. अन्यथा देश कोरोनापासून वाचू शकेल. पण लोक उपासमारीने मरतील.

तर आता प्रश्न असा आहे की अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतील? ते लॉकडाउन संपवण्याची जोखीम घेतील की ते लॉकडाऊन पुढे ढकलतील व लॉकडाऊन -3 आणतील? किंवा लॉकडाउन 3 लागू करुन दैनंदिन जीवनात काही सूट देतील.? प्रश्न हा आहे की जर लॉकडाऊन वाढले तर ते देशभरात होईल का? की काही निवडक क्षेत्रात ते उघडता येईल? आणि कोणत्या परिस्थितीसह लॉकडाउन उघडेल.

अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे की 3 मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला तर लॉकडाउन -3 कसे असेल. मोदी सरकार आणि त्यांचे मंत्री गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नावर चर्चा करत आहेत. आणि कोरोना वाढू नये यासाठी मार्ग शोधण्याची योजना आखली जात आहे. अर्थव्यवस्था ही वाचेल आणि लोक उपासमारीने ही मरणार नाहीत. असा मार्ग काढावा लागणार आहे.

लॉकडाउन -3 कसे असेल?

२५  मार्चपासून देश लॉकडाऊनमध्ये आहे. पण जर लॉकडाऊन नसता तर देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला असता. लॉकडाऊन असूनही, कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यात दिसला. लॉकडाऊन हटवण्यासाठी केंद्र सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि योजना मागवली आहे. त्यामुळे मागील २ लॉकडाऊन प्रमाणे तिसरा लॉकडाऊन नसेल असे संकेत मिळत आहे. गेल्या २ लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकारला यश आले आहे. पण अजूनही १०० टक्के यश मिळालेलं नाही.

दीड महिन्यात हजारो लोकांचे जीव वाचविण्यात यश आले. अधिक परिणाम झालेल्या राज्यांमध्ये लॉकडाउन सुरूच राहील अशी शक्यता आहे. राज्य झोन बनवून लॉकडाउनमध्ये सूट देतील. कोरोना बरोबरच अर्थव्यवस्था देखील सांभाळायची आहे. जिथे परिस्थिती चांगली आहे तेथे जिल्हास्तरावर सूट दिली जावू शकते.

पंतप्रधान मोदींकडे काही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा आग्रह धरला आहे. काही मुख्यमंत्र्यांनी लोकांचे दु:ख पाहता काही सवलतींबद्दलही चर्चा केली आहे. पण लॉकडाऊन पूर्णपणे उघडण्याचा धोका पत्कारण्यास ते तयार नाहीत. लॉकडाऊन उघडण्याचा धोका देशातील बहुतेक राज्यांना घ्यायचा नाही. कारण एकदा कोरोनाने आपले पाय पसरवले की त्याचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी अवघड होऊन जाईल.

सरकार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्यांचा समावेश करेल. रेड झोनमध्ये असलेल्या राज्यात लॉकडाऊन वाढवला जाईल. ओरेंज झोन म्हणजे जेथे कोरोनाचे रुग्ण आहेत पण हॉटस्पॉट नाहीत अशा ठिकाणी काही प्रमाणात सूट देण्यात येईल आणि ग्रीन झोन म्हणजे जेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तेथे ही सूट दिली जाईल.