मुंबई : लॉकडाऊनमध्ये ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली असून तीन टप्पात या लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यात येणार आहेत. प्रवास आणि वस्तूंची ने-आण करण्यात सर्वात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पण कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी हे नियम लागू होतील.
राज्यात ये-जा करता येणार येणार आहे. एका राज्यातून दुस-या राज्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता नसेल. कोणालाही राज्याबाहेर ये जा करता येईल. त्यासाठी कोणत्याही परवानगीची अथवा ई-परमीटची गरज लागणार नाही. तसेच राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशात वैद्यकीय सेवेकरता प्रवास करायचा असेल तर त्याकरता परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. असं असेल लॉकडाऊन ५ : तीन टप्प्यात व्यवहार शिथिल होणार
कर्फ्यु रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत असल्यामुळे या काळात प्रवास करता येणार आहे. यापूर्वी संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यु होता. तो वेळ कमी करण्यात आला आहे. कंटोन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत बंदी राहील.
मेडिकल इमरजेंसी सर्विसेस आणि आवश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील.(लॉकडाऊन ५.० : काय सुरु, काय बंद)
लॉकडाऊन 5.0मध्ये काय सुरु राहणार -
- 8 जूनपासून हॉटेल, मॉल सुरु होणार
- एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नाही
- दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारचा असणार
- देशभरात कुठेही जाण्या-येण्यावर बंदी नाही (देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम- केंद्रीय गृहमंत्रालय)
लॉकडाऊन 5.0मध्ये काय बंद राहणार -
- दिल्ली मेट्रो सध्या सुरु होणार नाही
- रात्री 9 ते सकाळी 5पर्यंत कर्फ्यू जारी
- परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी
- अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी
- दुकानांमध्ये एकावेळी केवळ 5 लोक खरेदी करु शकतात
- चित्रपटगृह, जिम, स्विमिंग पूल बंद