मुंबई : LML इलेक्ट्रिकने Saera Auto सोबत भागिदारी केली आहे. Saera Auto हरियाणाच्या ऑटो हबमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी आता एलएमएमसाठी इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आणि अत्याधुनिक आहे. कंपनीच्या दीर्घ अनुभव आणि नवीनतम प्रकल्पांमुळे कंपनीला एलएमएमसाठी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची संधी मिळाली आहे.
100 टक्के स्वदेशी बनावट
या भागिदारीची माहिती देताना एलएमएमचे सीईओ, डॉ योगेश भाटिया यांनी म्हटले की, टु व्हिलर आणि ऑटो सेगमेंटमध्ये गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असललेल्या या भागिदारीमुळे आम्ही उत्साहीत आहोत. Saera Auto ही आमची पहिली पसंती होती. कारण Saera Auto जगातील सर्वात मोठ्या ब्रॅंडपैकी एक असलेल्या कंपनीसाठी उत्पादने तयार करीत आली आहे.
एलएमएमला या भागिदारीतून मोठ्या अपेक्षा आहेत. 100 टक्के स्वदेशी बनावटीची उत्पादने तसेच त्यांच्या गुणवत्तेबाबतही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
एलएमएमची 1972 मध्ये सुरूवात
Saera Auto च्या मदतीने एलएमएम भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज प्लॅंट उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2025 पर्यंत संपू्र्ण स्वदेशी बनावटीचे प्रोडक्ट बाजारात आणण्याचे कंपनीचे लक्ष्य असणार आहे.
कंपनीच्या प्लॅंटची क्षमता दरमहिन्याला 18 हजार युनिटचे निर्मितीची आहे. एलएमएमची स्थापना 1972 मध्ये झाली होती.
कंपनीच्या स्कूटर 1980 - 1990 च्या दशकात लोकप्रिय होत्या. नंतर कंपनीने वेस्पा एक्सईचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर 1990 च्या दशकात कंपनीने मोटारसायकल देखील ल़ॉंच केली होती.