चांदीची भांडी आणि दागिने चमकतील चंद्रासारखे लख्ख, फक्त्त वापरा 'ही' सोपी ट्रीक

ज्वेलर्सकडे जाऊन आपल्याला मग आपल्या खिशातील पैसे काढून त्यावर खर्च करावा लागतो. 

Updated: Sep 8, 2022, 10:04 PM IST
चांदीची भांडी आणि दागिने चमकतील चंद्रासारखे लख्ख, फक्त्त वापरा 'ही' सोपी ट्रीक title=

Anklets Cleaning: चांदीचे दागिने, चांदीचे पायघोळ, अंगठ्या आणि घरात ठेवलेली भांडी काळी पडतात आणि त्यामुळे ती परत चमकदार होण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतात. चांदीची नाणीही अनेकदा काळी पडतात. ज्वेलर्सकडे जाऊन आपल्याला मग आपल्या खिशातील पैसे काढून त्यावर खर्च करावा लागतो. काही ज्वेलर्स साफसफाईच्या बहाण्याने चांदी काढून घेतात. अशावेळी घरी बसल्या मिनिटांत चांदीचे दागिने, भांडी किंवा नाणी पूर्वीसारखी चमकू शकता. त्यासाठी फक्त खाली दिलेल्या टिप्स फोलो करा. 

1. बेकिंग सोडा (Baking Soda) - बेकिंग सोडा एक उत्तम नैसर्गिक क्लींजर आहे. गरम पाण्यात बेकिंग सोडा टाकून पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट चांदीच्या भांड्यावर लावा आणि स्क्रब किंवा ब्रशच्या मदतीने घासून घ्या. यामुळे चांदीचा काळपटपणा दूर होऊन ती चमकेल.

2. व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) - गरम पाण्यात पांढरा व्हिनेगर घाला. त्यात थोडे मीठ घाला आणि यात चांदीची भांडी घाला. 15 मिनिटे थांबा आणि नंतर त्या वस्तू काढा आणि कापडाच्या मदतीने स्वच्छ करा अथवा स्वच्छ पाण्याने धुवा. अँकलेट किंवा अंगठी अगदी नवीन चांदीसारखी चमकेल.

3. अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) - प्रथम एक लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. आता या पाण्यात तुमचे चांदीचे दागिने घाला. काही वेळ राहू द्या आणि नंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि अॅल्युमिनियम फॉइलने घासून घ्या. काळेपणा निघून जाईल आणि तुमची  चांदीचे दागिने चमकेल.

4. टूथपेस्ट (Toothpaste) - तुम्ही दात पॉलिश करण्यासाठी जी टूथपेस्ट वापरता त्यात तुमच्या घरातील चांदीच्या वस्तू पॉलिश करण्याचीही ताकद असते. यासाठी तुम्हाला जुन्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावावी लागेल आणि ती तुमच्या  चांदीचे दागिन्यांवर किंवा कोणत्याही नाण्यावर किंवा भांडीवर लावून घसा. चांगले घासून झाल्यावर ही चांदी गरम पाण्यात टाकून काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)