LIC आणि Paytm मध्ये मोठा करार; पॉलिसीधारकांना हायटेक सुविधा उपलब्ध

पॉलिसीच्या प्रीमियमचा भरणा आता तुम्हाला Paytm च्या माध्यमातून करता येणार आहे.

Updated: Apr 19, 2021, 03:59 PM IST
LIC आणि Paytm मध्ये मोठा करार; पॉलिसीधारकांना हायटेक सुविधा उपलब्ध title=
representative image

नवी दिल्ली :  तुमच्याकडे भारतीय जीवन विमा महामंडळाची कोणतीही पॉलिस असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पॉलिसीच्या प्रीमियमचा भरणा आता तुम्हाला Paytm च्या माध्यमातून करता येणार आहे. LIC ने Paytm ला आपल्या सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट सेवा देण्यासाठी नियुक्त केले आहे. LIC ने  Paytm शी तसा करार केला आहे.

Paytm आणि LIC मध्ये झालेला करार 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 17 गेटवेने LIC च्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी बोली लावली होती.  Paytm च्या बहुस्तरिय पेमेंट सेवेने यात बाजी मारली. 

Paytm च्या काही सेवा LIC साठी उत्तम होत्या.  दोघांमधील करारामुळे पेमेंट प्रक्रिया सोपी होणार आहे. पेमेंट करण्याचे जास्त पर्याय पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध असतील.

LIC चे पेमेंट पॉलिसधारकांना GooglePay, PhonePe ने सुद्धा करता येऊ शकते.