मुंबई : LIC पॉलिसीधारकांना चांगले दिवस येणार आहेत. LIC कोणता नवा प्लान लाँच करत नाही पण LIC लवकरच IPO घेऊन येत आहे. यामध्ये LIC पॉलिसीधारक रिझर्वेशन कोटा ठरवू शकतात. र्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जाहीर केले की सरकार लवकरच जीवन विमा महामंडळाचा आयपीओ आणणार आहे. IPO ही संकल्पना मोदी सरकारनं मागच्याच वर्षी जाहीर केली होती. मात्र कोरोनामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात सरकार ही योजना राबवण्यावर भर देणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, LIC च्या IPO मध्ये १०% कोटा हा LIC धारकांसाठी असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या DIPAM विभागाचे सचिव तुहिन कांत पांड्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी कंपन्यांमधील IPO ला जसे १० टक्क्यांचे आरक्षण असते तसेच आरक्षण LIC धारकांना या IPO मध्ये मिळणार आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील बजेटच्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी LIC च्या IPO चा उल्लेख केला. याचा अर्थ असा की, सरकार LIC शेअर बाजारात लिस्ट करणार आहे. IPO च्या मार्फत LIC ची आर्थिक स्थिती यामुळे सामान्यांना कळणार आहे. गेल्यावर्षीच्या बजेट भाषणात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं की, LIC वर पूर्णपणे सरकारचा मालकी हक्क असणार आहे. लिस्टिंगनंतर IPO च्या माध्यमातून कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओचा उल्लेख केला आहे. LIC शेअर बाजारात रजिस्टर करेल. IPOद्वारे कंपनीचे आर्थिक मूल्य शोधता येणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, एलआयसी संपूर्णपणे सरकारच्या मालकीचे राहील. यादीनंतर आयपीओच्या माध्यमातून कंपनीची आर्थिक स्थिती निश्चित केली जाईल. त्यामुळे गुंतवणूकदार LICचे शेअर्स घेतील.