LIC scheme | जमा करा फक्त 121 रुपये, मुलीच्या लग्नासाठी LIC देणार 27 लाख

  तुमच्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी LIC ने नवीन स्किम सुरू केली आहे. LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy)सब्सक्राइब केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

Updated: Sep 2, 2021, 11:07 AM IST
LIC scheme | जमा करा फक्त 121 रुपये, मुलीच्या लग्नासाठी LIC देणार 27 लाख  title=

नवी दिल्ली :  तुमच्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी LIC ने नवीन स्किम सुरू केली आहे. LIC कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Policy)सब्सक्राइब केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

कागदपत्रांची गरज
या पॉलिसीचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्न दाखला, ओळखपत्र, रहिवासी पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटोची गरज असणार आहे. याशिवाय अर्ज आणि प्रीमियमसाठी चेक किंवा कॅशसोबतच जन्माचे प्रमाणपत्र देणे गरजेचे असेल.

कोण घेऊ शकतं पॉलिसी
जर तुम्हाला तुमच्या मुलीची पॉलिसी हवी आहे. तर तुमचे वय कमीत कमी 30 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच मुलीचे वय कमीत कमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे. पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. परंतु प्रीमियम 22 वर्षापर्यंतच भरणे गरजेचे आहे. उर्वरित तीन वर्ष प्रीमियम देण्याची गरज नाही. परंतु मुलीच्या वयानुसार पॉलिसीचा कार्यकाळ कमी देखील केला जाऊ शकतो.

डेथ बेनिफिट
जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला. तर कुटूंबाला प्रीमियम भरण्याची गरज नाही. जर अपघाती मृत्यू झाल्यास, कुटूंबाला 10 लाख रुपये मिळतील. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये मिळतील. सोबतच कुटूंबाला मॅच्युरिटीपर्यंत प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये मिळतील. 25 वर्षानंतर 27 लाख रुपयांची रक्कम नॉमिनीला देण्यात येईल.

या पॉलिसीमध्ये दररोज 121 रुपये म्हणजेच महिन्याला 36000 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागणार आहे. तुमची इच्छा असेल तर, यापेक्षा कमी प्रीमियमची पॉलिसीसुद्धा घेऊ शकता. परंतु यामुळे मिळणारी रक्कम कमी होईल.