LIC च्या IPOसाठी पॉलिसीधारकांना पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी; तरच मिळणार डिस्काउंट

LIC IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी हिस्सा राखीव असणार आहे. परंतू त्यासाठी काही अटी पॉलिसीधारकांना पूर्ण कराव्या लागतील. 

Updated: Feb 18, 2022, 03:52 PM IST
LIC च्या IPOसाठी पॉलिसीधारकांना पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी; तरच मिळणार डिस्काउंट title=

मुंबई LIC IPO Update:: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत. विशेषतः ज्यांच्याकडे एलआयसीची विमा पॉलिसी आहे, ते गुंतवणूकदारही आयपीओच्या अपडेटवर लक्ष ठेवून असतात. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांसाठी हिस्सा राखीव असेल असे, सरकारने म्हटले आहे. या आयपीओसाठी अर्ज करण्यासाठी पॉलिसीधारकांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हे जाणून घ्या...

LIC ने 13 फेब्रुवारीला साधारण 63000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्र दाखल केले. एलआय़सी आपला आयपीओ मार्चमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. या आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना सूट मिळणार आहे.

पॉलिसीधारकांसाठी अटी

एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर  https://licindia.in/ भेट द्या.

  • ऑनलाईन पॅन रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • याच पेजवर प्रोसिड बटनवर क्लिक करा
  • आपला ईमेल पत्ता, पॅन, मोबाईल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबर नमूद करा
  • बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ठ करा.
  • तु्मच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल.
  • तुम्हाला जेव्हा ओटीपी मिळेल तेव्हा त्याला त्या पोर्टलवर नमूद करा. 
  • फॉर्म जमा केल्यानंतर,  नोंदणी यशस्वी झाल्यााचा संदेश प्रदर्शित होईल.

डिमॅट खात्याची गरज

एलआयसीच्या आयपीओवर सर्वांची नजर आहे. पॉलिसीहोल्डर्सदेखील तयारीत आहेत. कारण पॉलिसी होल्डर्ससाठी आयपीओमध्ये हिस्सा राखीव असणार आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत पॉलिसी होल्डर्सला आपल्या PAN ची माहिती लिंक करणे गरजेचे असेल. याशिवाय डिमॅट खात्याचीही गरज असणार आहे. जर तुमच्याकडे डिमॅट खाते नसेल तर ते स्वखर्चाने सुरू करावे असेल एलआयसीने स्पष्ट केले आहे.