मुंबई LIC IPO ALERT: केंद्रीय अर्थमंत्रालयानं LICचा IPO 12 मे रोजी बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती 'झी मीडिया'च्या सूत्रांनी दिली. युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात आयपीओ बाजारात आणण्याचे प्रयत्न फसले होते. आता युद्धस्थिती रशिया युक्रेनपुरतीच मर्यादित झाल्यानं बाजारही स्थिरावले आहेत
त्यामुळे आयपीओ आणण्याच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला आहे. आज किंवा उद्या SEBI नव्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजूरी देण्याची शक्यता आहे.
एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून सरकारला साधारण 70 ते 80 हजार कोटी रुपये उभारायचे आहेत. त्यासाठी मे महिन्यात बाजाराची स्थिती अनूकुल असेल असा सरकारचा कयास आहे त्यामुळेच 12 मे रोजी आयपीओ बाजारात गुंतवणूदांरासाठी खुला करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.