मुंबई : LIC IPO: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने सांगितले की ज्यांनी ग्रुप इंश्योरेंस घेतली आहेत, त्या पॉलिसीधारकांना LIC IPO मध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तसेच LIC ने स्पष्ट केले की आरक्षणाचा लाभ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसह ग्रुप इंश्योरेन्सवर मिळणार नाही.
LIC ने 13 फेब्रुवारी 2022 रोजी मार्केट रेग्युलेटर SEBI कडे DRHP दाखल केला, ज्यामध्ये एलआयसीचे कोणते विमाधारक आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र असतील किंवा कोणते नसतील. याबाबत सविस्तर जाहीर करण्यात आले आहे.
2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू करण्यात आली. या पॉलिसीमध्ये, 18-50 वयोगटातील सर्व बचत खातेधारकांना एका वर्षासाठी 2 लाख रुपयांचे लाइफ कव्हर मिळेल.
यासाठी ग्राहकांना वर्षाला 330 रुपये प्रीमियम भरावा लागेल. लोकांना एलआयसी मार्फतदेखील या योजनेचा लाभ घेता येतो.
एलआयसीच्या आयपीओमध्ये विमाधारकांना 10 टक्के आरक्षण मिळू शकते.
LIC चा हा आयपीओ भारतीय शेअर बाजारासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. LIC मध्ये सरकारची 100% हिस्सा असलेली कंपनी आहे. त्यातील 5 टक्के हिस्सा शेअर बाजारात निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे.