लालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे.

Updated: Nov 8, 2017, 05:55 PM IST
लालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर  title=

पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि भाजप विरोधकांनीही लालकृष्ण आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मात्र आडवाणींना शुभेच्छा देताना मोदींवरच निशाणा साधला आहे.

आडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा शिष्य विरोधात गेला असला तरी त्याची काळजी करू नका. तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि तुम्ही दिर्घायू व्हा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे.

 

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय आडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांना दिर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्राथर्ना करतो. आडवाणीजींना देशासाठी कठोर परीश्रम आणि मेहनत घेतली आहे. आडवाणीजींचं नेहमीच मार्गदर्शन मिळत असल्यामुळे आम्ही भाजप कार्यकर्ते भाग्यवान आहोत. भाजपचं निर्माण करण्यामध्ये आडवाणीजींनी कठोर परीश्रम केले आहेत.