भ्रष्टाचार प्रकरणात होणाऱ्या पतीलाच अटक करणाऱ्या लेडी सिंघमचा मृत्यू... घात की अपघात?

Junmoni Death: आसामची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या जोनमणी राभाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पण कुटुंबियांनी हा अपघात नाही तर घातपात असल्याचा आरोप केलाय.

राजीव कासले | Updated: May 16, 2023, 05:53 PM IST
भ्रष्टाचार प्रकरणात होणाऱ्या पतीलाच अटक करणाऱ्या लेडी सिंघमचा मृत्यू... घात की अपघात? title=

Assam Police Officer Junmani Death: आसामची सुपर लेडी कॉप (Assam Lady Cop) अशी ओळख असलेल्या जोनमणी राभाचा (Junmoni Rabha) रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जोनमणी यांच्या कारची भरधाव ट्रकशी समोरासमोर टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचुर झाला. जोनमणी राभा स्वत: ही कार चालवत होते. जोनमणी राभा या आसामच्या लेडि सिंघम (Lady Singham) म्हणून ओळखल्या जायच्या. जोनमणी यांनी आपल्या होणाऱ्या पतीलाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती. 

जोनमणी राभा हिच्या कारचा आसाममधल्या नौगांव जिल्ह्याजवळ अपघात झाला. या अपघातात जोनमणी यांचा जागीच मृत्यू झाला. जोनमणी राभा नौगांव जिल्ह्याच्या पोलीस अधिकारी होत्या. जोनमणी या कडक शिस्तीच्या पोलीस अधिकारी होत्या. गेली वर्षी त्यांनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपाखाली अटक केली आणि त्यानंतर त्या देशभरात चर्चेत आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यानंतर त्याच भ्रष्टाचाराप्रकरणी जोनमणी यांनाही अटक करण्यात आली, पुढे कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. 

जोनमणी यांना कोणच्याही दबावाखाली काम करण्यास आवडत नव्हतं. एका आमदारालाही त्यांनी फोनवरुन धमकी दिली होती. ज्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जिल्ह्यातली जुनमणी यांना आरोपीच काय तर विविध क्षेत्रातील दिग्गज लोकंही घाबरुन होती. त्यामुळे जुनमणी यांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 

जोनमणी यांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचं आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी जुनमणी यांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

होणाऱ्या पतीला केलं होतं अटक
जोनमणी राबा नौगांव पोलीस स्टेशनच्या प्रभारी सब इन्स्पेक्टर असताना त्यांनी होणारा नवरा राणा पगग याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती.  जोनमनी राभा आणि राणा पगग यांची एका कार्यक्रमात ओळख झाली. यावेळी राणा पगगने आपण ONGC मध्य जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांनी राणा पगगने जोनमनी यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जोनमनी यांनी ही हा प्रस्ताव स्विकारला. 

जोनमनी आणि पगग यांच्या साखरपुडा झाल्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या. पण यादरम्यान जोनमनी यांना राणा पगगच्या कामावर संशय येऊ लागला. जोनमनी यांनी स्वत: पब्लिक रिलेशन आणि अॅडव्हरटाईजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे. त्यामुळे तीने राणा पगग याची माहिती काढायला सुरुवात केली. तपासानंतर तिचा संशय खरा ठरला. राणा पगग याचा ONGC शी काहीही संबंध नव्हता. ONGC मध्ये कंत्राट देण्याच्या नाखाली त्याने काही लोकांची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूकही केली होती.सत्यपरिस्थिती कळल्यानंतर जोनमनी राभा यांनी राणा पगग अटक केली. त्याच्याकडून बनावट कागदपत्र, बोगस आयडी कार्ड, एक लॅपटॉप, काही मोबाईल जप्त केले.