दिग्दर्शक संजय जाधवांच्या भूमिकेत जेव्हा कुशल बद्रिके येतो

पोटधरुन हसवणारं हे स्कीट

Updated: Aug 20, 2018, 05:00 PM IST
दिग्दर्शक संजय जाधवांच्या भूमिकेत जेव्हा कुशल बद्रिके येतो title=

मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्हाला हसवतोय. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. 400 व्या एपिसोडमध्ये जेव्हा कुशल बद्रिके दिग्दर्शक संजय जाधव यांची भूमिका करतो तेव्हा काय होतं....

पाहा व्हिडिओ

सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे.