यशोगाथा! रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय वापरून स्पर्धा परीक्षा पास

कुलीची प्रेरणा देणारी कहाणी....

शैलेश मुसळे | Updated: May 11, 2018, 06:22 PM IST
यशोगाथा! रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय वापरून स्पर्धा परीक्षा पास title=

नवी दिल्ली : सिव्हील सर्विस परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. कशा प्रकारे संघर्ष करुन त्यांनी हे यश मिळवलं हे नेहमीच इतरांना प्रेरणा देणारं असतं. एका कुलीने चक्क रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफायचा वापर करुन सिविल सर्विसेज परीक्षेत यश मिळवलं आहे. केरळच्या एर्नाकुलम जंक्शनवर मागील 5 वर्षांपासून कुली म्हणून काम करणाऱ्या युवक श्रीनाथने केरळ पब्लिक सर्विस कमीशनची परीक्षा पास केली आहे.

मोठी गोष्ट म्हणजे त्याने या परीक्षेसाठी कोणत्याही पुस्तकाचा वापर नाही केला. रेल्वे स्टेशनवरील वायफायचा वापर करुन त्याने माहिती घेतली. मोबाईलमध्ये तो या संबंधित व्हिडिओ बघायचा. त्याच्याकडे फोन आणि ईयरफोन याच्या शिवाय कोणतंही पुस्तक नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रीनाथ 3 वेळा या परीक्षेला बसला होता. पहिल्यांदा त्याने अभ्यास रेल्वेच्या वायफायचा वापर करुन केला.

कुली म्हणून काम करत असताना जेव्हा तो सामान उचलायचा तेव्हा कानात त्याच्या ईयरफोन असायचा. आता जर श्रीनाथ इंटरव्यूसाठी पास झाला तर तो लँड रेवेन्यू डिपार्टमेंट विलेज फील्ड असिस्टंट म्हणून नियुक्त होऊ शकतो. श्रीनाथ मन्नारचा राहणारा आहे. एर्नाकुलम त्याच्या जवळच स्टेशन आहे. त्याने म्हटलं की, फ्री वायफायने माझासाठी यशाचं दार उघडलं.