Knowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण

Hole in Padlock: तुमच्या घरात असलेल्या कुलूपाचं तुम्ही कधी नीटपणे निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला त्या कुलूपाच्या खाली एक छिद्र दिसेल. नेमकं हे छिद्र कशाला का असतं? माहिती आहे का? जाणून घ्या

Updated: Nov 18, 2022, 07:11 PM IST
Knowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण title=

Padlock Has Hole On Bottom: आपण बाहेर फिरण्यासाठी गेलो तर घराच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी ही एका कुलूपावर असते. घराला लागलेलं कुलूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. त्यामुळे कुलूप मजबूत आणि टिकाऊ असावं याबाबत प्रत्येकजण आग्रही असतो. पण तुम्ही कधी घरातील कुलूपाकडे बारकाईने पाहिलं आहे का? टाळ्याची चावी लावता त्या बाजूला एक छोटं छिद्र दिसतं. कधी कधी प्रश्न पडतो हे छिद्र का असावं. तेवढ्यापुरता आपल्या डोक्यात हा प्रश्न येतो आणि नंतर आपण विसरून जातो. यामुळे चोरांना मदत तर होणार नाही? अशीही भीती वाटते. अनेकदा या छिद्रात पिन टाकून कुलूप खोलू शकतो का? असंही वाटतं. पण हे छिद्र त्यासाठी नसतं. तर कुलूपाला छिद्र ठेवण्यामागे खास कारण आहे. चला जाणून घेऊयात छिद्र काय भूमिका बजावते?

कुलूपाला छोटं छिद्र असण्यामागचं कारण

घराला लावलेलं कुलूप कायम चौकीदाराची भूमिका बजावते. त्यामुळे कुलूप दरवाज्याला बाहेर लावलं जातं. त्यामुळे पावसात त्यात पाणी जाऊन आतून गंजण्याची शक्यता असते. त्यामुळे चावी असूनही कुलूप खोलणं कठीण होतं आणि तोडावं लागतं. त्यामुळे ही समस्या जाणवू नये यासाठी कुलूपाच्या खाली एक छोटं छिद्र असतं. टाळ्यात वरून पाणी भरलं तरी त्या छिद्रातून निघून जाईल. दुसरीकडे कुलूप ऑयलिंग करण्यासाठी या छिद्राचा उपयोग होतो. 

बातमी वाचा- Video: सलग 12 दिवसापासून मेंढ्या धावताहेत रिंगणात! त्यांच्या कृतीने आश्चर्याचा धक्का

कुलूपाचा इतिहास माहिती आहे का?

कुलूपाचा इतिहास जवळपास 4000 वर्षे जुना आहे. जगातील सर्वात जुनं कुलूप खोरसाबाद राजवाड्यात सापडलं होतं. कालांतराने कुलूपाचा बराच विकास झाला. नवनव्या डिझाईनचे कुलूपं तयार करण्यात आली. आधुनिक जगातील डबल-अॅक्टिंग पिन टंबलर लॉकचं पेटंट अमेरिकन डॉक्टर अब्राहम-ओ'स्टॅन्सबरी यांनी 1805 मध्ये घेतले होते. आम्ही वापरत असलेल्या लॉकचा शोध 1848 मध्ये अमेरिकन लिनस येल आणि सीनियर यांनी लावला होता.