या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा तुमची हुशारी, 'रेल्वे स्टेशन'ला हिंदीत काय म्हणतात ?

तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या रेल्वेला आपण याच नावाने ओळखत आलो आहोत, त्या रेल्वेचं खरं नाव काय आहे? 

Updated: Feb 14, 2022, 04:09 PM IST
या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवा तुमची हुशारी, 'रेल्वे स्टेशन'ला हिंदीत काय म्हणतात ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : 'झुक झुक झुक झुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी... ' हे गाण आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. रेल्वेची आणि ही आपी पहिली ओळख असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक टप्प्यांवर, अनेक प्रसंगांमध्ये आपण रेल्वेने प्रवास करतो. 

रेल्वेनं प्रवास करताना मागे पडणारे स्थानक, स्थानकांसोबत मागे सुटणारे प्रदेश, प्रांत, गाव हे सर्वकाही कुतूहल वाढवून जातात. 

तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या रेल्वेला आपण याच नावाने ओळखत आलो आहोत, त्या रेल्वेचं खरं नाव काय आहे? 

शुद्ध हिंदी भाषेत रेल्वेला असा शब्द आहे जो सहसा ऐकतानाही आपल्या भुवया उंचावतील. 'लोह पथ गामिनी' हा रेल्वेला असणारा हिंदी शब्द आहे. 

अगदी सोप्या भाषेत रेल्वेला रेलगाडी असंही म्हटलं जातं. हे झालं रेल्वेला असणाऱ्या हिंदी शब्दाबद्दल. 

फक्त रेल्वेच नव्हे तर रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशनलाही हिंदीत एक वेगळा शब्द आहे. 

अगदी सुस्पष्ट हिंदी भाषेमध्ये 'लोह पथ गामिनी विराम बिंदू' असं लांबलचक नाव आहे. वाटतंय ना हे नाव अगदी त्या रेल्वेप्रमाणेच लांबलचक? 

सध्या सोशल मीडियावर रेल्वेच्या या हिंदी नावासंदर्भातील प्रश्न विचारत अनोखी प्रश्नमंजुषा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

भाषेची ही अशीच गंमत आहे. मराठी, हिंदी या भाषांमध्ये काही शब्दांसाठी असणारे अर्थ हे कुतूहल निर्माण करण्यासोबतच आपल्याला आश्चर्यचकित करणारेही आहेत.