Notice Period For Job: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत काम करत असाल, तर नोटीस पिरियडबद्दल ऐकलं असेलच. अनेक कर्मचारी चांगल्या पदासाठी आणि पगारासाठी वेळोवेळी नोकऱ्या बदलतात आणि राजीनामा देतात. मात्र राजीनामा दिल्यानंतरही नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. कंपनीत रुजू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडून काही करार केले जातात. यात नोटीस कालावधीबाबतही नोंद असते. जवळपास प्रत्येक खासगी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरियडबाबत नियम असतो. कंपनीत एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास, कंपनी त्याला नोटीस कालावधी पूर्ण करण्यास सांगते.
नोटीस पिरियडमध्ये नियोक्त्याला कळते की, तुम्ही कंपनी सोडत आहात. मग त्या कालावधीत कंपनी तुमची रिप्लेसमेंट शोधते. जेणेकरून तुमच्या जाण्याने रिक्त होत असलेली पोस्ट भरण्यासाठी इतर कोणाला तरी आणता येईल. तुम्ही राजीनामा देताच तुमचा नोटीस पिरियड सुरू होतो.वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोटीस पिरियड वेगळं असू शकतो. कुठे 15 दिवस तर कुठे एक महिन्यांचा नोटीस पिरियड असतो. याशिवाय दोन महिने किंवा तीन महिन्यांचा नोटिस पिरियड असू शकतो. तुम्ही कोणत्याही कंपनीत रुजू होता तेव्हा निश्चितपणे करार केला जातो. यामध्ये नोटीस कालावधीचीही माहिती देण्यात आलेली असते. जर तुम्ही या करारावर स्वाक्षरी केली असेल, तर कंपनीच्या नियम आणि नियमांनुसार, तुम्हाला नोटीस पिरियड पूर्ण करणे आवश्यक आहे. पनी सक्ती करू शकत नाही
कोणतीही कंपनी तुम्हाला नोटीस पिरियडसाठी सक्ती करू शकत नाही. काही नियमांचे पालन करून, तुम्ही नोटीस पिरियड न देता कंपनी सोडू शकता. पण यासाठी नोटीस पिरियड इतकी रक्कम कंपनीला द्यावी लागते. ही रक्कम तुमच्या मूळ पगारातून वजा केली जाते. समजा तुमचा नोटिस कालावधी 30 दिवसांचा असेल परंतु तुम्ही फक्त 17 दिवसांचा नोटिस पिरियड दिला आणि 13 दिवस आधी कंपनी सोडली तर तुम्हाला उर्वरित 13 दिवसांचे पैसे कंपनीला द्यावे लागतील. हा सेटलमेंट तुमच्या पूर्ण आणि अंतिम रकमेत केला जातो.