जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Updated: Apr 16, 2021, 09:22 AM IST
जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे आजचे दर  title=

मुंबई : एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरातून काहीसा दिलासा मिळतोय. सलग 15 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर काल थोडाशी कपात करण्यात आली. हा एप्रिल महिन्यातला पहिला बदल आहे. पण आज किंमती बदलल्या नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मार्च महिन्यात तीन वेळा कमी करण्यात आल्या. एप्रिलमधील ही पहिला कपात आहे. येथे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलची किंमत आता प्रति बॅरल 66 डॉलरवर गेली आहे.

15 एप्रिलपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल 30 मार्च 2021 ला झाला. दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले. मार्चमध्ये पेट्रोल 61 पैसे स्वस्त झाले आणि डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झाले. मार्चमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती 3 वेळा कमी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाची कमजोरी. कच्चे तेल कित्येक आठवड्यांपासून अशक्तपणा दर्शवित आहे.

कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलरवरून घसरून प्रति बॅरल 63 डॉलरच्या खाली आली आहे. पण आता ते वेगात वाढतेय. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेल 16 वेळा महागले होते. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर अजुनही विक्रमी उच्च पातळीवर आहेत.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.83 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत हा दर 90.40 रुपये आहे. मुंबईत आज डिझेलची किंमत 87.81 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत हा दर 80.73 रुपये इतका आहे.