पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

Updated: May 12, 2021, 09:09 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या आजचे दर  title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. (Petrol Diesel Price 12 May 2021) पुन्हा 12 मे 2021 रोजी ही वाढ पाहायला मिळतेय. तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies)पेट्रोल प्रतिलिटर 25 पैसे आणि डिझेल 27 पैशांपर्यंत प्रतिलिटर महाग केले आहे.

इंडियन ऑईलच्या(Indian Oil) वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) वाढून 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये झाली आहे. 

त्याचप्रमाणे मुंबईत पेट्रोलची किंमत (Petrol price in Mumbai) 98.36 रुपये आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये आहे. 

कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आणि डिझेलची किंमत 85.45 रुपये आहे. 

चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Diesel Price Today) 93.84 रुपये आणि डिझेलची किंमत 87.49 रुपये झाली आहे.