मुंबई : सलग तीन दिवसांच्या दरवाढीनंतर आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल दिसला नाही. मागच्या आठवड्यात सलग 4 दिवस किंमती वाढविण्यात आल्या होत्या. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्याने हे दर महागाईच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत.
4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 4 दिवस वाढविण्यात आल्या होत्या. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निवडणुकांमुळे पहिले 18 दिवस शांत राहिल्या.
आज पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यात आतापर्यंत दिल्लीत पेट्रोल 1.65 रुपयांनी महाग झाले आहे. तर या महिन्यात डिझेल 1.88 रुपयांनी महाग झाले आहे.
यापूर्वी 15 एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. 15 एप्रिलपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटचा बदल 30 मार्च 2021 रोजी झाला.
दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले. मार्चमध्ये पेट्रोल 61 पैसे स्वस्त झाले आणि डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झाले. मार्च महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती 3 वेळा कमी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाची कमजोरी.
दिल्लीत आज पेट्रोल 92.05 रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे. मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आहे. आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 93.84 रुपयांवर विकले जात आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत ? यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.