आता नोकरी गेली तर 'नो टेन्शन'! दरमहा जमा होणार पगार, जाणून घ्या कसं ते

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कायम आर्थिक सुरक्षिततेची भीती असते. कोरोनाच्या कालावधीनंतर लोकांमध्ये ही भीती आणखीनच वाढली आहे.

Updated: Jul 7, 2022, 05:35 PM IST
आता नोकरी गेली तर 'नो टेन्शन'! दरमहा जमा होणार पगार, जाणून घ्या कसं ते title=

Salary Protection Insurance: नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कायम आर्थिक सुरक्षिततेची भीती असते. कोरोनाच्या कालावधीनंतर लोकांमध्ये ही भीती आणखीनच वाढली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अशा परिस्थितीत पगारदार लोकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 'सॅलरी प्रोटेक्शन इंश्योरेंस' म्हणजेच पगार संरक्षण विमा हा एक अतिशय चांगला पर्याय ठरेल. आजकाल बहुतांश विमा कंपन्या ही योजना ऑफर करत आहेत. वास्तविक, ही एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी नियमित उत्पन्नाची रक्कम देते. तुम्हालाही ही पॉलिसी घ्यायची असेल तर याबाबत जाणून घ्या

दोन प्रकारे मिळतो लाभ

टर्म इंश्योरेंस पॉलिसी घेताना तुम्ही गरजेनुसार पर्याय निवडू शकता. तुम्ही तुमची रक्कम दोन प्रकारे घेऊ शकता. पहिलं म्हणजे नियमित मिळकत आणि दुसरी एकरकमी. ज्या लोकांना गुंतवणुकीबाबत माहिती नसते किंवा सुरक्षित परताव्यावर विश्वास ठेवतात, असे लोक नियमित उत्पन्न पेआउट पर्यायासह मुदत पॉलिसी निवडू शकतात. या पॉलिसीत कोणताही मॅच्युरिटी लाभ नाही. यामध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, केवळ नॉमिनीला एकरकमी रक्कम एक खात्रीशीर मृत्यू लाभ म्हणून मिळते. वेतन विमा पॉलिसीच्या अटींनुसार, विमाधारकाच्या मृत्यूनंतर ठराविक कालावधीसाठी नियमित देयके दिली जातात. 

मासिक उत्पन्न किती मिळू शकते?

तुम्हाला मासिक उत्पन्न निवडायचे असेल जे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला द्यायचे आहे. ही रक्कम तुमच्या सध्याच्या मासिक टेक-होम उत्पन्नापेक्षा कमी किंवा समान असू शकते. पुढे, तुम्हाला पॉलिसी आणि प्रीमियम भरण्याची मुदत निवडावी लागेल. उदाहरणार्थ, वयाच्या 30 व्या वर्षी (धूम्रपान न करणाऱ्यांसाठी), तुम्ही नियमित प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी 15 वर्षांसाठी पॉलिसी खरेदी करू शकता.

संपूर्ण गणित समजून घ्या

तुमच्या मासिक उत्पन्नावर तुमची वार्षिक टक्केवारी वाढवून विमा कंपनी तुम्हाला देऊ शकते. उदाहरणार्थ, जर विमा कंपनी तुम्हाला उत्पन्नावर 6% वार्षिक चक्रवाढ दर देऊ शकत असेल, तर तो नेहमीच इतका असेल असे नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक पॉलिसी वर्षाची मासिक रक्कम मागील वर्षाच्या मासिक उत्पन्नाच्या 106% असेल. म्हणजेच दरवर्षी त्यात वाढ होत राहील.

उदाहरण

  • समजा तुम्ही पॉलिसी खरेदी करताना 50,000 रुपयांच्या मासिक उत्पन्नाची निवड केली आहे.
  • आता पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षी हे मासिक उत्पन्न रु.53,000 पर्यंत वाढेल.
  • त्यानंतर पुढील वर्षी त्याची किंमत 56,180 रुपये असेल.
  • आता, पाचव्या पॉलिसी वर्षाच्या सुरुवातीला पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी मृत्यूचे उदाहरण घेतल्यास, नॉमिनीला 7.6 लाख रुपयांचा खात्रीशीर मृत्यू लाभ आणि 63,124 रुपये वाढीव मासिक उत्पन्न मिळेल.