Kiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...

Business Idea For Kiwi Fruit: किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही. 

Updated: Feb 22, 2023, 08:53 PM IST
Kiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...  title=

Business Idea For Kiwi Fruit: आपल्याला 9 ते 5 कुठलातरी जॉब (Business Idea For Kiwi Fruit) करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याकडे भर असतो. आपल्यालाही असेच वाटतं असते की आपण काहीतरी हटके करावे त्यासाठी आपण वेगळा काहीतरी विचार करायाचा प्रयत्न करतो आणि त्याप्रकारे काम करायला सुरूवात करतो. आता शेतीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू लागले आहे त्यामुळे शेतीमध्येही बिझनेस (Business Idea) करायला भरपूर स्कॉप निर्माण झाला आहे. त्यामुळे तुम्हीही अशाप्रकारे काही नवी बिझनेस आयडिया शोधू शकता आणि शेतीचा एक हटके पर्याय आजमावू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि त्यातून थोडीशी पगारातून बचत करावी लागणार आहे. 

किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका यातून तुम्हीही चांगलीच छप्परफाड कमाई करू शकता. त्यातून तुम्हाला फक्त काही ट्रीक्स या लक्षात ठेवायच्या आहेत. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही हा बिझनेस (Business Ideas in Agricultural) कसा सुरू करू शकता आणि तुमचा बिझनेस कसा वाढेल. 

आपला देश हा शेतीप्रधान देश (Agricultural) आहे. त्यामुळे आपल्या इथे वेगवेगळ्या गोष्टींची शेती करणं हा एक वेगळा अनुभव असतो त्यातून आपल्यालाही फार वेगळ्या गोष्टी त्यातून शिकताही येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतीबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्या देशात शेतीतून चांगला पैसा, उत्पन्न मिळू लागले आहे तेव्हा तुम्हीही अशाच काही गोष्टींची शेती करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. किवी या फळाची शेती त्यापैंकीच एक आहे. 

किवीचं वैशिष्ट्यं असं की, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फायबर, पोटॅशियम, कॉपर असे अनेक गुण असतात त्यामुळे आपल्याला या फळाचा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला फायदा करू घेता येतो. या फळात रोगप्रतिरोधक गोष्टी असतात. 

कशी कराल किवीची शेती ? 

1. किवीत अनेक गुणधर्म असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या फळाच्या शेतीसाठी जलवायू आणि माती खूप जास्त प्रमाणात लागते. 

2. या फळाची शेती ही थंड जागी होते तेव्हा या फळासाठी 6-7 डिग्री सेल्सियसचं तापमान असावे लागते. किवीच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला माती लागते. थंड ठिकाणी तुम्ही किवीची शेती करू शकता. 

3. लक्षात ठेवा की तुम्हाला मातीचा पीएच हा 5-7 च्या वर असणं महत्त्वाचे असते. एका फळाची किंमत ही 40-50 रूपयांपर्यंत आहे.