किस केल्याने होतो 80000000 बॅक्टेरियांचा फैलाव; गंभीर आजारांचा धोका

Kissing Side Effects: किस करणे हा रोमान्सचा एक भाग आहे.  एकमेकांशी जवळीक साधत असताना किस केल्याने एकमेकांचे आकर्षण आणखी वाढते. प्रेमातील विश्वास आणखी आणखी वाढतो. मात्र, सतत किस करणे तोंडाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 9, 2023, 11:13 AM IST
किस केल्याने होतो 80000000 बॅक्टेरियांचा फैलाव; गंभीर आजारांचा धोका title=

Kissing Side Effects in Marathi: जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्याचे उत्तन माध्यम म्हणजे एकमेकांचे चुंबन घेणे अर्थात किस करणे. किस केल्याने प्रेमातील विश्वास आणखी वाढतो. तसेच शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या देखील याचे अनेक फायदे आहेत. मात्र, किस करण्याचे अनेक दुरुपयोग देखील आहेत. Kiss केल्याने होतेय 80000000 बॅक्टीरियाचा फैलावा होतो. यामुळे तोंडावाटे होणाऱ्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो (Oral health). 

किस करणे हा रोमान्सचा एक भाग आहे.  एकमेकांशी जवळीक साधत असताना किस केल्याने एकमेकांचे आकर्षण आणखी वाढते. प्रेमातीव विश्वास आणखी आणखी वाढतो. मात्र, सतत किस करणे तोंडाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. वारंवार एकमेकांना किस केल्याने  तोंडाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. शरीरात अनेक विषाणूंचा प्रेवश हा तोंडावाटेच होत असतो. यामुळे जोडीदाराचे मौखिक आरोग्य खराब असल्यासा याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

तोंडाच्या आजारांचा धोका वाढू शकतो

किस केल्याने काय धोके निर्माण होऊ शकतात याबाबत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जोडीदाराला Kiss करताना  80 दशलक्ष जीवाणूंची देवाणघेवाण होते. यामुळे तोंडाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. सध्या अनेक जण दातांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. हिरड्या फुगणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दातांमध्ये फट असणे, दात किडलेले असणे, तोंडाून दुर्गंधी येणे अशा अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत जोडीदाराला किस केल्यास अनेक मौखिक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. 

पोकळ दात

किड लागल्यामुळे दात पोकळ होतात.  स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळे दात किड लागून पोकळ होतात. यामुळे दात खराब होतात तेसच ते सडू लागतात. हे जीवाणू लाळेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज जाऊ शकतो. 

हिरड्यांचे रोग

अनेकांना हिरड्यांच्या अनेक समस्या असतात. हिरड्या फुगणे, हिरड्यांमधून रक्त येणे तसेच अनेकांच्या हिरड्यांमधून पू देखील येत असतो. अशा स्थितीत किस केल्यास बॅक्टीरियांचा फैलाव होण्याचा धोका अधिक असतो. यालाच पीरियडॉन्टल डिसीज असे देखील म्हणतात. यामुळे दात लवकर खराब होतात. तसेच ते पडण्याची देखील भिती असते. 

तोंडाची दुर्गधी

बऱ्याचदा अन्न पदार्थ दांतांमध्ये अडकून राहते. यामुळे पदार्थ तोंडात कुजून त्यांतून दुर्गंधी येते. यामुळे तोंडातून दुर्गंधी येत असल्यास किस करणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे.  

टीप - संशोधनाच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे. zee 24 तास याची पुष्टी करत नाही.