वायनाड : केरळच्या पूरग्रस्तांमधून बेघर झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आपला लोकसभा मतदार संघ वायनाडमध्ये पोहोचलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी एका व्यक्तीने त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. एकाने भेट घेण्याच्या निमित्ताने चुंबन घेतले. त्यावेळी सुरक्षा जवानांनी त्या व्यक्तीला दूर केले.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना हात मिळविण्यासाठी एक चाहता पुढे झाला. मात्र, काही सेकंदातच त्यांने बहाणा करत राहुल यांचे चुंबन घेतले. हा व्हिडीओ वायनाडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे.
राहुल गांधी केरळमधील आपला मतदारसंघ वायनाडच्या दौऱ्यावर असून यावेळी एका व्यक्तीने हात मिळवताना अचानक राहुल यांचे चुंबन घेतले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांना थोडे अवघडल्यासारखे वाटले. दरम्यान, हा सगळा प्रकार व्हिडिओत चित्रित झाला आहे. व्हिडिओत राहुल गांधी कारमध्ये बसलेले आहे. लोकांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसत आहे.
Kerala: A man kisses Congress MP Rahul Gandhi during his visit to Wayanad. pic.twitter.com/8hk2et4ifJ
— ANI (@ANI) August 28, 2019