सणासुदीला एटीएममधून अगोदरच पैसे काढून ठेवा, अन्यथा...

बँकांच्या या सुट्ट्यांदरम्यान तुम्हाला कॅशचा प्रश्न पडू शकतो 

Updated: Oct 27, 2018, 12:44 PM IST
सणासुदीला एटीएममधून अगोदरच पैसे काढून ठेवा, अन्यथा...  title=

मुंबई : ऐन दिवाळीत चार दिवस बँकांना सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी ७ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, गुरूवारी ८ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा बँकांना सुट्टी असेल. शुक्रवारी भाऊबीजेच्या दिवशी बँका सुरू असतील. मात्र त्यानंतर शनिवार-रविवारची सुट्टी असणार आहे. 

त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसांत नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना एटीएम किंवा कॅशलेश व्यवहारांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात बँकांना तब्बल ११ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. बँकांच्या या सुट्ट्यांदरम्यान तुम्हाला कॅशचा प्रश्न पडू शकतो.