श्रीनगर : काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. हा दहशतवादी ग्रेनेड सप्लायर असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून दहशतवाद्याचा मृतदेह, तसेच शस्त्रास्त्रे, दारुगोळा ताब्यात घेण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उफैद फारुक लोन उर्फ अबू मुस्लिम अशी त्याची ओळख पटली असून तो अवंतीपुरायेथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात झालेल्या चकमकीत, अनेक हल्ल्यांसाठी ग्रेनेड पुरवणाऱ्या लश्कर-ए-तोयबाच्या दशवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
#UPDATE Jammu and Kashmir: Another terrorist has been gunned down in an encounter with security forces in Awantipur, he was affiliated with terror outfit Jaish e Mohammad. https://t.co/Nolgpy5rE6
— ANI (@ANI) October 8, 2019
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी गेल्या वर्षीच या दहशतवाद्यांमध्ये सामिल झाला होता. तो अवंतीपुरा, रेसिपोरा आणि मालनपोरा येथे सक्रिय होता. कॉलेज ड्ऱ़ॉपआउट उफैद गेल्या 4 वर्षांपूर्वी जुलै 2018 मध्ये बेपत्ता झाला होता. त्यानंतर एके-४७ रायफलसह त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
J&K:Security forces eliminated terrorist Ufaid Farooq Lone of Lashkar e Toiba,in encounter in Awantipur. Lone was involved in many terrorist activities including recent grenade attacks& in threatening & beating shopkeepers and fruit growers post abrogation of Articles 370 and 35A
— ANI (@ANI) October 8, 2019
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याविरोधात इतर दहशतवाद्यांना हत्यारे आणि ग्रेनेड उपलब्ध करुन देण्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर या दहशतवाद्यावर लोकांना धमकावणे, दुकानदार, फळ विक्रेत्यांना धमकावून, त्यांना मारहाण करणे असे आरोपही असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा दहशतवादी इतर युवकांना या मार्गात येण्यासाठी उकसावत असून हा दहशतवादी मारला गेल्याने मोठे यश मिळाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.