पद्मावतच्या वादावर करणी सेनेने उचललं मोठं पाऊल

'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमाच्या बाजुने निकाल दिला नंतर आता करणी सनेने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठवलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 23, 2018, 03:11 PM IST
पद्मावतच्या वादावर करणी सेनेने उचललं मोठं पाऊल title=

मुंबई : 'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमाच्या बाजुने निकाल दिला नंतर आता करणी सनेने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठवलं आहे.

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने बावडी गेटवर जिल्हा महासचिव प्रताप सिंह नारी यांच्या नेतृत्वात सिनेनिर्माता भंसाली यांचा पुतळा जाळला. पद्मावत सिनेमाविरोधात घोषणाबाजी करत सिनेमा बॅन करण्याची मागणी करण्यात आली. 

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसडीएम रेणू मीणा यांच्याकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिलं. या निवेदनात म्हटलं आहे की, जर सिनेमा रिलीज झाला तर तोडफोड आणि इतर सर्व प्रकारची जबाबदारी सरकारची असेल.

पद्मावतवर बॅन करण्याच्या मागणीसाठी आता करणी सेना पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.