कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेस पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे या रणधुमाळीत प्रचार करत आहेत. 

Updated: May 14, 2018, 08:07 AM IST

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेस पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे या रणधुमाळीत प्रचार करत आहेत. राज्यात त्रिशंकु परिस्थीती निर्माण होईल असं नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वे मध्ये दिसुन आलय. त्यामुळं भाजापा आणि कॉग्रेसचे नेते मतदारांना स्पष्ट बहुमताचं सरकार द्या असं अवाहन करत सभा आणि रॉलींचा धडाकाच लावला आहेत.