या 8 जागा ठरवतात कर्नाटकची सत्ता

कर्नाटकच्या राजकारणातील 8 महत्त्वाच्या जागा

Updated: May 15, 2018, 05:05 PM IST
 या 8 जागा ठरवतात कर्नाटकची सत्ता title=

बंगळुरु : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपने मुंसडी मारली आहे. सर्वच पक्षांनी कर्नाटकात ताकद झोकून दिली होती. पण भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर होती. पण कर्नाटकात अशा 8 जागा आहेत ज्या संपूर्ण कर्नाटकाची दिशा ठरवतात. या 8 जागा कर्नाटकमध्ये ठरवतात की कोणाची सत्ता येणार.

8 जागा ठरवतात कर्नाटकची सत्ता

1. शिराहट्टी : मागच्या 7 विधानसभा निवडणुकीत हेच पाहायला मिळालं आहे की या जागेवर ज्या पक्षाने विजय मिळवला आहे त्याच पक्षाची सत्ता कर्नाटकात आली आहे.

2. येलबुर्गा : उत्तर कर्नाटकातील मागील 5 विधानसभा निवडणूकीत हे दिसलं आहे की ज्या पक्षाने या जागेवर विजय मिळवला तो राज्यात सत्तेवर आला आहे.

3. जेवार्गी : उत्तर कर्नाटकातील ही आणखी एक जागा आहे जी मागील 4 विधानसभा निवडणुकीत राज्याची सत्ता कोणत्या पक्षाच्या हातात येईल हे ठरवते.

4. गडग : मध्‍य कर्नाटकातील गडग मागील 4 वर्षापासून ठरवत आहे की राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल.

5. हारापलाहल्‍ली : कर्नाटकात हारापलाहल्ली विधानसभा जागा अशी आहे ज्याने 4 विधानसभा निवडणुकीत राज्याची सत्ता ठरवली आहे.

6. बैंदूर : सातवें स्‍थानावर असलेली ही जागा मागील 4 विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आहे. या जागेवर ज्याने विजय मिळवला तो राज्यात सत्तेत आला.

7. तारिकेरे : 4 विधानसभा निवडणुकीत ही जागा देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. जी राज्यात सरकार स्थापनेसाठी मदत करते.
 
8. दवनगेरे : आठव्या स्थानावर असलेली ही जागा मागील 4 निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.