बंगळुरु : कर्नाटकमध्ये १५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीसाठी कर्नाटक पोटनिवडणूक: ६६.४९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल ९ डिसेंबरला लागणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. १५ जागांपैकी किमान सहा जागा भाजपने जिंकायला पाहिजे. अन्यथा येडियुरप्पा सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीवरच येडियुरप्पा सरकारची कसोटी आहे.
Karnataka: Voting for #KarnatakaBypolls concludes; Visuals from a polling station in Shivajinagar constituency in Bengaluru pic.twitter.com/rfip6uyP2g
— ANI (@ANI) December 5, 2019
कर्नाटकमधील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. या पोटनिवडणुकीमुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे. राज्यात सत्तेत राहण्यासाठी भाजपाला २२५ विधानसभा सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या एकूण १५ जागांपैकी ६ जागा जिंकणे आवश्यक आहे.
कर्नाटक विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत असली तरी अजूनही मास्की आणि आरआर नगरच्या जागा रिक्त आहेत. या पोटनिवडणुकीचा निकाल ९ डिसेंबर रोजी लागणार आहे. या पोटनिवडणुका १७ आमदारांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी घेण्यात येत आहेत. या आमदारांमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर नेत्यांचा समावेश होता.
Karnataka: Latest voter-turnout figures for the 15 assembly constituencies in the state, that are up for by-polls. #KarnatakaBypolls pic.twitter.com/JIj4K4HAHH
— ANI (@ANI) December 5, 2019
या आमदारांच्या बंडखोरीमुळे यावर्षी जुलैमध्ये एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात काँग्रेस-जेडीएस सरकार पडले आणि भाजपला सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडे सध्या १०५ आमदार (अपक्षांसह), काँग्रेसकडे ६६ आणि जेडीएसचे ३४ आमदार आहेत. बसपचाही १ आमदार आहे. तसेच यात एक नामनिर्देशीत आमदार आणि विधानसभा अध्यक्षांचा समावेश आहे.