कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी बलात्कार पीडितेशी केली स्वत:ची तुलना

 वादग्रस्त ऑडियो क्लिपप्रकरणी होणाऱ्या आरोपांविषयी त्यांनी लक्ष वेधून घेतले.

Updated: Feb 13, 2019, 09:01 AM IST
कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी बलात्कार पीडितेशी केली स्वत:ची तुलना  title=

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी मंगळवारी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली. बलात्कार पीडितेला देखील त्या घटनेविषयी सारखे सारखे प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे आपली अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. वादग्रस्त ऑडियो क्लिपप्रकरणी होणाऱ्या आरोपांविषयी त्यांनी लक्ष वेधून घेतले. हे ऑडियो क्लिप प्रकरण सरकारने विशेष शोध पथकाकडे (एसआयटी) सोपावले आहे. ऑडियो क्लिपच्या एसआयटी चौकशीप्रकरणी विधानसभेत सुरू असलेल्या चर्चैदरम्यान ते बोलत होते.  या ऑडियो क्लिपमध्ये भाजपा प्रदेश युनिटचे अध्यक्ष बी.एस.येदियुरप्पा यांना कॉंग्रेस-जद (एस) सरकार पाडण्याचा कथित प्रयत्नात जद च्या एका आमदाराला लालच दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर येतेय. सारख्या केल्या जाणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे कारण तिला देखील त्या घटनेविषयी सारखे सारखे प्रश्न विचारले जात असतात. 

आमदाराला लालच दाखवण्याच्या कथित ऑडिओ क्लिपच्या एसआयटी चौकशीचा भाजपा कर्नाटक युनिट अध्यक्ष बी.एस. येदियुरप्पा यांनी विरोध केला.  मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करणाऱ्या संस्थेकडून या प्रकरणाचा शोध करुन घेणे योग्य राहणार नाही. कारण कुमारस्वामी स्वत: यामध्ये पहिले आरोपी आहेत. आपण जारी केलेल्या ऑ़डियो क्लिपची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी सोमवारी केली होती. कॉंग्रेस-जदचे सरकार पाडण्याचा कथित प्रयत्न येदियुरप्पा करत असल्याचे यातून समोर येत होते. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी भावूक होऊन या घटनेची एसआयटी चौकशी करण्याचा 'सल्ला' दिला होता. कारण याप्रकरणात त्यांचेही नाव गोवले गेले होते. हा सल्ला कुमारस्वामींनी मान्य केला.

50 कोटींची भरपाई 

या कथित चर्चेत येदियुरप्पाने भाजपाच्या मदतीसाठी राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 50 कोटी देण्याचे म्हटले होते. मला शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडून ऑ़डियो क्लिप आणि एक पत्र मिळाले यातील आवाज नेमका कोणाचा होता हे सांगणे कठीण असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.