Kapil Sibal left Congress: कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला राम राम, समाजवादीकडून राज्यसभा निवडणूक रिंगणात

Kapil Sibal left Congress:  काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला कायमचा 'हात' दाखवला आहे.  

Updated: May 25, 2022, 01:52 PM IST
Kapil Sibal left Congress: कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला राम राम, समाजवादीकडून राज्यसभा निवडणूक रिंगणात title=

नवी दिल्ली : Kapil Sibal left Congress:  काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला कायमचा 'हात' दाखवला आहे. ते आता राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी दिला राजीनामा  

 कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी बुधवारी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी 16 मे रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी अखिलेश यादव यांच्याशिवाय सपा खासदार राम गोपाल यादवही उपस्थित होते. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी सांगितले की, त्यांनी 16 मे रोजी काँग्रेसकडे राजीनामा दिला होता. मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. 

देशात स्वतंत्र आवाज व्हावा, अशी माझी नेहमीच इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, 'स्वतंत्र आवाज असणे महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षात राहून आम्हाला युती करायची आहे. जेणेकरुन मोदी सरकारला विरोध करता येईल, असे कपिल सिब्बल यावेळी म्हणाले.

सपा आणि स्वतःचे मत मांडणार : अखिलेश यादव

कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या उमेदवारीनंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, 'आज कपिल सिब्बल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जात आहेत. आणखी दोन लोक पक्षात प्रवेश करु शकतात. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी आपले मत संसदेत चांगले मांडले आहे. आम्हाला आशा आहे की ते सपा आणि स्वतः दोघांचेही मत मांडतील.

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक 

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 11 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी भारतीय जनता पक्षाला सात आणि समाजवादी पक्षाला तीन जागा मिळू शकतात. दुसरीकडे 11 व्या जागेसाठी अडचणी निर्माण होणार असून, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.