कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक तितकीच सामाजातील संस्कारांचे अध:पतन झाल्याचे दाखवून देणारी घटना घडली आहे. येथील चार वर्षाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्काराची केल्याची घटना घडली आहे. भयावह असे की, ६ ते १२ वर्षे वयोगटातील चार मुलांनी हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे. मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओ पाहून त्यांच्या मनात बलात्कार करण्याचा विचार आला. दरम्यान, चारही आरोपींवर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
चार वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन आरोपींनी बलात्कार केल्याची ही घटना महाराजपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. स्थानिक पोलीस प्रमुख राकेश मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनीवारी (३० जून) घडली. पीडितेच्या आईने या घटनेबाबत २ जुलै रोजी प्राथमिक तक्रार दिली होती. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्य माहितीनुसार, बेशुद्ध आणि विवस्त्र अवस्थेत पीडिता शेतात सापडली. शुद्धीवर आल्यावर तिने घडलेल्या अत्याचाराची कल्पना दिली. तिच्यावरील अत्याचाराची कहाणी कळताच कुटुंबियांना जोरदार धक्का बसला.
Kanpur: 4-yr-old girl allegedly gang raped by children aged b/w 6 to 10 yrs of age in Maharajpur police station area on 30 June. Police say 'Case under POCSO Act registered, children detained. They had probably watched pornographic content on their phone. It's being investigated' pic.twitter.com/70ZVAe2pIg
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2018
दरम्यान, मौर्य यांनी सांगितले की, एक आरोपी १२ वर्षांचा आहे. तर, इतर तीन आरोपी ६ ते १० वर्षे वयोगटातील आहेत. सर्व आरोपींना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.