नवी दिल्ली : 'कच्चा बादाम' हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. याचे रिल्स तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या गाण्याने तरुणांनाच नाही तर जगाला वेड लावलं आहे. गायक भुबन बड्याकार याने हे गाणं म्हटलं आहे. कच्चा बदाम फेम गायक भुबनचा अपघात झाला होता. त्याला दुखापत झाली.
गायक भुबनला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता चाहत्यांसाठी खुशखबर आहे. भुबनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याची प्रकृती सध्या ठिक असून तो घरी परतला आहे.
कोण आहे भुबन?
भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचं काम करतो. तो हटके पद्धतीनं शेंगदाणे विकतो. कच्चा बदाम हे गाणं गात त्याने शेंगदाणे विकले त्याचं गाणं खूप जास्त व्हायरल झालं. त्यानंतर हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं. ज्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला.
काचा बादाम या त्याच्या शेंगदाणे विकण्याच्या स्टाईलमुळे तो आज सगळीकडे चर्चेत आहे. काचा बादाम विकण्यासाठी म्हणजे शेंगदाणे विकण्यासाठी तो अशाप्रकारे गाणं म्हणायचा.
पण या गाण्याचा अर्थ देखील समोर आला आहे. तो शेंगदाणे विकण्यासाठी पैसे घेत नव्हता. तो शेंगदाण्यांच्या बदल्यात वस्तू लोकांकडून घेतो. तो बांगड्या, चैन अशा वस्तू द्या आणि त्या जागी तितक्याच वजनाचे शेंगदाणे द्या असं या गाण्यातून सांगत आहे.