Joint Home Loan: लहानपण, शिक्षण, महाविद्यालयीन आयुष्य, करिअरच्या वाटा, शिक्षणाला साजेशी नोकरी आणि त्यातूनच पुढे पाहिलं जाणारं हक्काच्या घराचं स्वप्न. अनेकांच्याच आयुष्यात या गोष्टी सहसा याच क्रमानं घडतात. किंबहुना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा पहिलं ध्येय्य असतं ते म्हणजे एक सुरेखसं स्वत:चं घर घेण्याचं.
बरीच (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलतीनंतर अखेर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत अनेकजण पोहोचतात. निर्णय सोपा नसला तरीही तो अशक्यही नसतो. यामध्ये अधिक मदत होते ती म्हणजे आर्थिक नियोजनाची आणि बँकांकडून मिळणाऱ्या Loan ची.
जवळपास 80 ते 90 टक्के खरेदीदार हे घराची रक्कम गृहकर्जाच्या माध्यमातून फेडतात. साधारण 20 ते 30 वर्षांपर्यंत हे कर्ज आपली पाठ सोडत नाही. पण, घराखातर अनेक हौसेमौजेंना आळा घातला जातो. या साऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो तो म्हणजे व्याजदर. अशा वेळी एक पर्याय तुमची बरीच मदत करू शकतो. तो म्हणजे Joint Home Loan.
तुम्ही विवाहित असाल तर, पत्नीला घराच्या कर्जासाठी Co Applicant किंवा Co owner बनवून तुम्ही हा फायदा मिळवू शकता. त्यातही तुमची पत्नी जर नोकरी करत असेल तर या फायद्यात आणखी काही गोष्टींची भरही पडू शकते.
- को-ओनरशिपचा फायदा घेण्यासाठी पत्नीलाही कर्जाचे हप्ते भरावे लागतात. पत्नीकडे घराची 50 टक्के मालकी असल्यास तिनं अर्ध कर्ज फेडणं अपेक्षित असतं. कर्ज सुरु असतानाच पत्नीनं नोकरी सोडल्यास त्याची माहिती बँकेला द्यावी लागते.
- तुमची पत्नी या व्यवहारामध्ये Co Applicant आणि Co owner सुद्धा आहे, तर तुम्हाला याचा दुहेरी फायदा मिळतो. Home Loanच्या प्रीपेमेंटमुळं व्याजदरात कलम 24 अंतर्गत 2 लाखांपर्यंतची करमाफी मिळते. प्रिन्सिपल अमाऊंट रिपेमेंटवर सेक्शन 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांचं Tax Benefit सुद्धा मिळतं. ज्यामुळं तुम्हाला एकूण 3.5 लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो. पत्नी को ओनर असल्यास हा फायदा दोघांनाही मिळून नेट टॅक्स बेनिफिट 7 लाख रुपये इतकं असेल.
- लोनच्या प्रस्तावामध्ये Co applicant चा उल्लेख असल्यास लगेचच कर्ज मिळतं. इथं रिस्क रिवॉर्ड कमी होतो. एकल अर्जदाराच्या बाबतीत इथं पडताळणी आणि त्यापुढील प्रक्रियेसाठी जास्त वेळ दवडला जातो.
- बऱ्याच आर्थिक संस्था महिलांना कमी व्याजदरानं कर्ज देतात. शिवाय उच्च आणि स्थिर मिळकत असणाऱ्या अर्जदारांनाही कमी व्याजदरात कर्ज दिलं जातं. महिला अर्जदार असल्यास त्याना इथं दुपटीनं फायदा मिळतो.
- तेव्हा तुमचीही पत्नी नोकरी करतेय तर नव्या घर खरेदीच्या व्यवहारात तिला सहभागी करून घेत Co Applicant करा. जेणेकरून कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत तुम्ही पात्र ठराल, त्यात तुमचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास कर्जाचं ओझंही वाटणार नाही.