नवी दिल्ली: बँकेमध्ये सर्वात मोठी पदांची भरती निघाली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक, HDFC बँकेत नोकरीची संधी आहे. बँक या आर्थिक वर्षात 500 रिलेशनशिप मॅनेजरची नियुक्ती करणार आहे. HDFC बँक आपल्या एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून या पदांवर भरती करत आहे. या बँकेचा 575 जिल्ह्यांमध्ये आपली ब्रँच आणि व्याप्ती वाढवण्याकडे कल आहे.
500 नव्या नियुक्यांसह बँकेत MSME वर्टिकलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 2500 पर्यंत होईल. जूनपर्यंत बँकेत एकूण कर्मचारी संख्या 1.23 लाख एवढी झाली होती. आता पुन्हा एकदा बँकेनं भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलेशनशिप मॅनेजर आणि सुपरवायझर्ससह सध्या 545 जिल्हे समाविष्ट करते, जे या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 575 किंवा त्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्याचा विचार सध्या बँक करत आहे.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार बँकेत बिझनेस बँकिंग आणि हेल्थकेअर फायनान्सचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष सुमंत रामपाल म्हणाले की, आम्ही या एमएसएमई वर्टिकलचा विस्तार 545 जिल्ह्यांतून 575 जिल्ह्यांत करत असल्याने आम्ही 500 नवीन लोकांच्या शोधात आहोत. त्यामुळे या पदासाठी खास भरती सुरू आहे. वर्टिकल कर्मचाऱ्यांची संख्या 2,500 पेक्षा जास्त असायला हवी असंही त्यांचं मत आहे.
रामपाल यांच्या म्हणण्यानुसार एचडीएफसी बँक गेल्या 2 वर्षांपासून एमएसएमई क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करत आहे आणि त्याचबरोबर कोरोनामुळे सरकारने छोट्या व्यवसायांना संकटातून वाचवण्यासाठी अनेक उपाय केले. आणीबाणी क्रेडिट लाइन हमी योजना सर्वात मोठी बूस्टर ठरली. डिसेंबर 2020 पर्यंत 30 टक्के अधिक कर्ज वितरीत करणारी बँक देखील ठरली आहे.
बँकेनं आता 500 कर्मचाऱ्यांसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. त्याचे अर्ज करताना ऑनलाइन करता येणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.