नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू शांतिश्री धुलीपुडी पंडित (santishree dhulipudi pandit) यांनी देवी देवतांबाबत केलेल्या विधानामुळे विद्यापीठ चर्चेत आले आहे. त्यामुळे नेमकं देवी-देवतांबाबत त्या काय म्हणाल्या आहेत, ते जाणून घेऊयात.
हिंदू देव कोणत्याही उच्च जातीमधून आलेले नाहीयेत. कोणताही देव ब्राम्हण नाही. शंकर महादेवही मागास जमातीमधील असावेत, कारण त्यांचे निवास स्मशानात असतो, असे विधान जेएनयू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू शांतिश्री धुलीपुडी पंडित (santishree dhulipudi pandit) यांनी केले आहे. यासोबतचं त्यानी मनूस्मृतीवर आपलं मत व्यक्त केले.
केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकार मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील आंबेडकर आतंरराष्ट्रीय केंद्रात डॉ. बी. आर आंबेडकर थॉट ऑन जेंडर जस्टिस: डिकोडिंग द युनिफॉर्म सिव्हिल कोड या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी त्या बोलत होत्या.
लक्ष्मी, शक्ती आणि जग्गनाथ आदिवासी
या चर्चासत्रात शांतीश्री पंडित (santishree dhulipudi pandit) म्हणाल्या की, मानववंशशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीचे नाहीत. कोणीही देवता ब्राम्हण नाही. सर्वांत उच्च दर्जा क्षत्रियांचा आहे. अगदी भगवान शिवही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असावेत, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच ब्राम्हण कधी स्मशानात बसू शकतील, असे वाटत नाही. म्हणूनच देव उच्च जातींमधील नाही. हे स्पष्ट आहे. लक्ष्मी, शक्ती आणि जग्गनाथ असे सर्व देवी-देवता आदिवासी आहेत. मग आपण अमानवीय असे भेदभाव अजूनही का पाळत आहोत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बौद्ध धर्म सर्वांत महान
शांतीश्री पंडित (santishree dhulipudi pandit) बौद्ध धर्माबाबत म्हणाल्या की, बौद्ध धर्म सर्वांत महान धर्मांपैकी एक आहे.मतभेद, वेगवेगळे विचार यांनी भारतीय सभ्यतेत स्थान दिले जाते, हे या धर्मानुसार सिद्ध होते, असे त्या म्हणाल्या. तसेच त्या म्हणतात की, ब्राम्हणवादी हिंदू धर्माचे पहिले विऱोधक गौतम बुद्ध आहेत. ते पहिले तर्कवादी होते. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी पुनपरूज्जीवित केलेली परंपरा आज आपल्याकडे आहे, असेही त्या म्हणतात.
मनुस्मृतीवर काय म्हणाल्या?
मनुस्मृतीचा उल्लेख करत शांतीश्री पंडित म्हणाल्या, मनुस्मृतीनुसार सर्व महिला शूद्र आहेत. पती किंवा वडिलांमुळेच महिलेला तिची जाळ मिळते. ही बाब प्रतिगामित्वाचे लक्षण असल्याचे त्या म्हणतात.
ऐरवी विद्यार्थ्यांमुळे चर्चेत येणारे जेएनयु विद्यापीठ पहिल्या महिला कुलगुरू शांतीश्री पंडित यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहे. त्याच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.