JEE Main 2023 : जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर

JEE Main 2023 Details : जेईई परीक्षा देण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या माहितीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केव्हा आहे इथपासून त्यासाठी अर्ज कधी करायचा आहे इथपर्यंतची माहिची मिळणार आहे. 

Updated: Dec 16, 2022, 07:16 AM IST
JEE Main 2023 : जेईई मेन परीक्षेसंदर्भातील मोठी बातमी; सर्व महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर  title=
JEE Main 2023 exam dates notice application form admit card january april paper 1 2

EE Main 2023 Details : जेईई परीक्षा देण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या माहितीद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केव्हा आहे इथपासून त्यासाठी अर्ज कधी करायचा आहे इथपर्यंतची माहिची मिळणार आहे. थोडक्यात जेईईच्या मुख्य परीक्षेसाठीची अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होणार आहे. तर, दुसऱ्या सत्राची परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात असेल. यंदाच्या वर्षीसुद्धा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सदरील परीक्षेच्या आखणीची सर्व जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकरडे सोपवण्यात आली आहे. 

कधी सुरु होणार अर्ज प्रक्रिया? 
NTA नं अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार पहिल्या सत्रामध्ये जानेवारी 2023 दरम्यान परीक्षा होईल. यासाठी अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

हेसुद्धा वाचा : ना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला

सध्या प्रथम सत्रासाठीच अर्ज करता येणार आहे. जेईई मुख्य 2023 परीक्षेसाठी अर्ज भरताना फक्त पहिलं सत्रच Visible असेल, जो पर्याय विद्यार्थी निवडू शकतील. पुढच्या सत्रामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरता येईल. 

 

आता मराठीतूनही देता येणार परीक्षा 

जेईईची मुख्य परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये देता येणार आहे. यामघ्ये इंग्रजीसोबतच हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तामिळ, उर्दू आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे. 

ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख - 15 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 202, सकाळी 9 वाजेपर्यंत 

क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/ युपीआयनं शुल्क भरण्याची शेवटची तारीख- 12 जानेवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत. 

परीक्षा केंद्रांची घोषणा- जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा 

एनटीएच्या संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची तारीख - जानेवारी महिन्यातील तिसरा आठवडा 

जेईईच्या पहिल्या सत्रातील परीक्षेच्या तारखा - 24, 25, 27, 28, 29, 30, 31 जानेवारी 2023

जेईई मुख्य परीक्षेसाठी पात्रतेविषयी सांगावं तर, यामध्ये 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एनआयटी, ट्रीपल आयटी, मध्ये जेईई मुख्य परीक्षेमधील रँकिंगच्या आधारे प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. 

JEE Main 2023 : परीक्षेविषयी आणखी काही गोष्टी 

जेईई मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. ज्यामध्ये पेपर 1 (बीई/बीटेक) एनआयटी, आयआयटी आणि सीएफआयटी किंवा मग विश्वविद्यालयांमध्ये किंवा तांत्रित शिक्षण देण्याऱ्या संस्थांमध्ये इंजिनिअरिंगसाठीच्या प्रवेशासाठी असतो. तर, पेपर 2 बी आर्क आणि बी प्लानिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाचा असतो. जेईई एडवान्स्डसाठीसुद्धा जेईई मुख्य परीक्षा ही पात्रता फेरी ठरते. या माध्यमातून आयआयटीमध्ये प्रवेश शक्य होतो.