मुंबई : ईदच्याच दिवशी पाकिस्तानने जम्मूतल्या अरनिया आणि नौशेरा भागात गोळीबार झाला आहे. जगभरात सगळीकडे ईदचा उत्साह असताना मात्र पाकने आपले कृत्य सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन केले आहेय अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 हून अधिक दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांना निशाण्यावर घेतलं आहे. सीमेच्या पलिकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये नौशेरामध्ये एक जवान शहीद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शिपाई विकास गुरूंग असं या जवानाचं नाव आहे.
Jammu & Kashmir: Sepoy Bikas Gurung lost his life during ceasefire violation by Pakistan in Nowshera pic.twitter.com/gg3XwAaU9z
— ANI (@ANI) June 16, 2018
दहशतवाद्यांनी भारताचा जवान औरंगजेब याची निर्घुण हत्या करण्यात आली. या हत्येअगोदरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहीद जवानाचे पार्थिव आज घरी आणण्यात आले असून शासकिय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. दहशतवाद्यांनी औरंगजेब यांना एका झाडाखाली बसवलं आहे आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. व्हिडिओत कुठल्याही दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, दहशतवाद्यांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत आहे. या व्हिडिओत रायफलमॅन औरंगजेबला त्याच्या वडिलांचं नाव, घर, कुठल्या चकमकीत सहभागी होता असे अनेक प्रश्न दहशतवादी विचारत आहेत. तु मेजर शुक्लाच्या टीममध्ये सहभागी होतास का? असा प्रश्नही दहशतवादी विचारत आहेत. मेजर शुक्ला यांच्या टीमने दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा केला होता.