'जालियनवाला बाग हत्याकांड ही लाजिरवाणी घटना' ब्रिटन उच्चायुक्तांचे पत्र

 'जालियनवाला बाग हत्याकांड ही लाजिरवाणी घटना' असल्याचा उल्लेख ब्रिटन उच्चायुक्तांनी केला आहे.

Updated: Apr 13, 2019, 03:37 PM IST
'जालियनवाला बाग हत्याकांड ही लाजिरवाणी घटना' ब्रिटन उच्चायुक्तांचे पत्र title=

अमृतसर : जालियनवाला बाग हत्याकांडास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटन सरकारने भारत सरकारला पत्र लिहिले आहे.  'जालियनवाला बाग हत्याकांड ही लाजिरवाणी घटना' असल्याचा उल्लेख ब्रिटन उच्चायुक्त डोमिनिक एक्यूथ यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. 100 वर्षांपुर्वी घडलेली ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. इथे जे काही झाले त्याचा आम्हाला खेद आहे. हा लाजिरवाणे होते. ब्रिटीश उच्चायुक्तांनी शहीद स्मारकास श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली.

जालियनवाला बाग हत्याकांडास शंभर वर्षे पुर्ण झाल्यानंतर या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येने लोक पोहोचु लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जालियनवाला बाग येथे जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धूसह अनेक मंत्री देखील उपस्थित होते. 

आजपासून शंभर वर्षांपुर्वी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना जालियनवाला बागेत शहीद करण्यात आले. हा एक भयानक नरसंहार होता, सभ्यतेवर एक डाग होता. त्यांचे हे बलिदान भारत कधी विसरु शकत नाही असे ट्वीट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

 या घटनेत शहीद झालेल्यांना भारत श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्यांची वीरता आणि बलिदान विसरले जाऊ शकत नाही. त्यांची स्मृती भारताच्या निर्माणासाठी आणि अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरणा देणारी असेल. ज्यावर आम्हाला नेहमीच गर्व असेल असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.