जीएसएलव्ही मार्क 3 चं यशस्वी उड्डाण

जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं श्रीहरीकोटातून यशस्वी उड्डाण झालं. 

Updated: Jun 5, 2017, 07:00 PM IST
जीएसएलव्ही मार्क 3 चं यशस्वी उड्डाण title=

चेन्नई : जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं श्रीहरीकोटातून यशस्वी उड्डाण झालं. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला. 

या प्रक्षेपकाद्वारे भविष्यात अंतराळवीरांना पाठवणं इस्रोला शक्य होणार आहे. भारताला 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे संपर्कयंत्रणा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परदेशी जावं लागत होतं. 

जीसएसएलव्ही मार्क-3 मुळे आता आपल्याचा चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवणं शक्य होणार आहे. यामुळे भारत याक्षेत्रात स्वयंपूर्ण होईल तसंच परदेशी ग्राहकांनाही भारत आपल्याकडे आकर्शित करु शकणार आहे.