डॉ.अब्दुल कलाम : भारताच्या मिसाईल मॅनबाबत ५ खास गोष्टी

आज भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची 86 वी जयंती आहे.

Updated: Oct 15, 2017, 01:01 PM IST
डॉ.अब्दुल कलाम : भारताच्या मिसाईल मॅनबाबत ५ खास गोष्टी  title=

मुंबई : आज भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची 86 वी जयंती आहे.

भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कलाम यांच्याबद्दल तुम्हांला या ५ गोष्टी नक्की जाणून घ्या. 

शाळेनंतर पेपर विकत असे - 
हालाखीची परिस्थिती असल्याने शाळा सुटल्यानंतर अब्दुल कलाम वर्तमानपत्रही वाटत असे. 

अब्दुल कलाम त्यांचा पगार दान करत असे - 
अब्दुल कलाम त्यांचा पगार आणि सेव्हिंग राष्ट्रपती झाल्यानंतर प्रोव्हाईडिंग अर्बन अ‍ॅमिनिटीज टू रूरल एरिआ या त्यांनी स्थापन केलेल्या संसथेला दान करत असे. 

तिरूअनंतपुरममधील खास भेट - 
राष्ट्रपती असताना ऑफिशिएल दौर्‍यावर असताना अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जुन्या चप्पल शिवणार्‍या (मोची)  व्यक्तीची देखील भेट घेतली होती. सोबतच काम करता करता त्यांनी  गप्पा देखील मारल्या होत्या. 

साधी रहाणी - 
डॉ अब्दुल कलाम यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांनी कधीच टीव्ही खरेदी केला नव्हता. त्यांच्याकडे पुस्तकं, वीणा, काही कपडे, सीडी प्लेअर आणि लॅपटॉप होता. अब्दुल कलाम यांनी मृत्यूपत्रदेखील बनवलेले नव्हते. त्यांची मालमत्ता मोठ्या भावाला देण्यात आली. 

राष्ट्रपती भवन 'सोलार एनर्जी'ने उजळवण्याचा प्रयत्न  - 
डॉ. कलाम यांनी राष्ट्रपती भवनामध्ये सोलार एनर्जी लावण्याचा प्रयत्न केला  होता. मात्र त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.