नोकरीच्या भूलथापांना बळी पडू नका, 'आयबी'चं आवाहन

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते... 

Updated: Oct 21, 2017, 06:05 PM IST
नोकरीच्या भूलथापांना बळी पडू नका, 'आयबी'चं आवाहन title=

मुंबई : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते... 

नोकरीची अत्यंत गरज असेल तर फसव्या जाहिरातींच्या बळी पडू नका, असं आवाहनच इंटेलिजन्स ब्युरोनं (आयबी) केलंय. नोकरीची आवश्यकता असणाऱ्या तरुणांना भुलवून आपल्या जाळ्यात ओढण्याची अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर आयबीनं ही सूचना जाहीर केलीय. 

काही असमाजिक तत्त्व वेगवेगळ्या पदांसाठी तरुणांना आपल्याकडे आकर्षित करून भूलवत आहेत. 'आयबी'कडून आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेसाठी मदत करण्याच्या थापाही दिल्या जात आहेत. इतकंच नाही तर काही उमेदवारांना तर खोटे नियुक्ती पत्रंही धाडण्यात आलेत. 

नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या आणि संभावित उमेदवारांना वेळीच सूचित करण्यासाठी आयबीनं हे पाऊल उचललंय.

'आयबी'च्या कुठल्याही पदासाठी अर्ज करताना विस्तृतपणे जाहिरात वाचा... आणि आपण शैक्षणिक योग्यतेसाठी पात्र आहोत की नाहीत ते पडताळून पाहा, असंही आयबीनं म्हटलंय.