Indore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश

Indore Beleshwar Temple Accident :  इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Mar 31, 2023, 07:20 AM IST
Indore Accident: इंदूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 18 जणांना वाचविण्यात यश

Indore Beleshwar Temple Accident : मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. इंदूरमधील झुलेलाल मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान भाविक मंदिराच्या विहिरीत पडले. विहिरीचा स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली होते. बचाव पथकाला 18 जणांना वाचवण्यात यश आले, तर 16 जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

18 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 35 जणांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक शोध आणि बचाव कार्य करत आहेत, अशी माहिती इंदूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. काल श्री रामनवमी होती. राम मंदिरात उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी मंदिरामध्ये यज्ञ सुरु होता. त्यामुळे अनेक भाविक दुर्घटनाग्रस्त विहिरीवरील स्लॅबवर उभे होते. त्याचवेळी जास्त वजनामुळे हा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यानंतर मंदिर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. 

इंदूरमधील स्नेह नगरजवळ असलेल्या पेटल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिर आहे. रामनवमीनिमित्त या ठिकाणी काल मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थितीत होते. याच वेळेच येथील विहिरीवर बांधलेला स्लॅब कोसळला. त्यामुळे या स्लॅबवर उभे असलेले 25 लोक विहिरीमध्ये पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा आकडा जास्त होता.

या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती असून चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळेच मदतकार्य  करण्यात अडचण निर्माण झाली. बचाव आणि मदत करणाऱ्या टीमला मंदिरापर्यंत जाण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. या विहिरीमध्ये पडलेल्या काही भाविकांना वर काढून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी मदतकार्यवर नजर ठेवली. दुर्घटनेच्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळा येत होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x