Fish Food : भारताला मोठा समुद्रकिनारा लाभला असूनस दक्षिण भारतीय राज्यांप्रमाणंच महाराष्ट्रालाही विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 720 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. असं असतानाच देशाला मिळणारी मत्स्यसंपदाही अधिक असून या मासळीवर प्रेम करणाऱ्यांचा आणि मत्स्यप्रेमींचा आकडाही देशात लहान नाही. मागील काही वर्षांमध्ये देशातील मत्स्योत्पादनाचा खप वाढला असून यासाठी जाणकारांनी 2005 - 06 आणि 2019- 21 अशा 15 वर्षांदरम्यानच्या मासळीच्या विक्रीची आकडेवारी आणि खपाचा आकडा यांचं विश्लेषण केलं. यानुसार मासळीचा खप 730.6 (66%) मिलियन ते 966 दरम्यान झाला.
मोठ्या प्रमाणात मत्स्याहार करणाऱ्या या भारतामध्ये इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च (आईसीआर), मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर एंड फार्मर्स वेलफेयर आणि वर्ल्ड फिश इंडियाचा एक अहवाल समोर आला. ज्यानुसार देशात मासे आणि मत्स्योत्पादनाचा खप लक्षणीयरित्या वाढला आहे.
भारतात मासे खाणाऱ्यांचा आकडा 96.69 कोटींवर पोहोचला आहे. 2019-20 दरम्यानच्या काळात दर दिवशी मासे खाणाऱ्यांचा आकडा 5.95 टक्के इतका होता. आठवड्यात एकदाच मासे खाणाऱ्यांमध्ये 34.8 टक्के भारतीयांचा समावेश होता. तर, फार क्वचित मासे खाणाऱ्यांमध्ये 31.35 टक्के भारतीयांचा समावेश पाहायला मिळाला. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्र नव्हे, त्रिपुरामधील नागरिक सर्वाधिक मत्स्याहार करत असल्याची अहवालातून समोर आलं. इथं मासे खाणाऱ्यांचा आकडा 99.35% इतका आहे. तर, सर्वात कमी प्रणाण हरियाणामध्ये पाहायला मिळालं. इथं अवघे 20 टक्के नागरिक मासळी खातात.
भारतातील पूर्वोत्तर राज्यांसह दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडू, केरळ, गोव्यातही मासळीचा अधिक खप होतो. आश्चर्य म्हणजे सध्या जम्मू काश्मीरमध्येही मासे खाणाऱ्यांचा आकडा वाढत याहे. अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मासे खाणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठ्या फरकानं कमी आहे.